सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 क्राईम

बीडमध्ये गुन्हेगारीची मालिका सुरूच; केजमध्ये मुलीच्या लग्नासाठी धमकी, अंबाजोगाईत महिलेवर दोन वर्षे अत्याचार

डिजिटल पुणे    21-04-2026 14:51:23

बीड : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. केज तालुक्यात एका तरुणाने घरात घुसून मुलीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्याची मागणी करत तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सायंकाळच्या सुमारास घराच्या मागील बाजूने प्रवेश करत छतावरून उडी मारून घरात घुसखोरी केली. त्यानंतर घरातील मायलेकींना धमकावत “मुलीचं लग्न माझ्यासोबत लावा, नाहीतर तिच्या वडिलांचा जीव घेईन,” असे म्हणत दहशत निर्माण केली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अंबाजोगाई येथेही एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका 28 वर्षीय महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकत धमक्या दिल्या.

या प्रकरणी सलमान अजीज पठाण या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तो सध्या फरार आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला विवाहित असून तिला चार मुले आहेत आणि ती काही काळ आरोपीसोबत राहत होती.दोन्ही घटनांमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती