मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नियुक्तीचा करार हस्तांतरण पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या विविध जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात, तसेच परिवहन विभागाच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ ची परिणामकारकता वाढविणे हा या नियुक्तीमागील प्रमुख उद्देश आहे. रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांच्या प्रसारासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्राची लाडकी जोडी आणि लोकप्रिय कलाकार रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
करार: रितेश आणि जेनेलिया देशमुख पुढील ५ वर्षांसाठी एसटी महामंडळाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करतील.
उद्देश: एसटी महामंडळाच्या 'रस्ता सुरक्षा अभियान', प्रवासी जागृती आणि सामाजिक संदेशांचा प्रसार करणे हा या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे.
करार हस्तांतरण: २२ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा करार सोहळा पार पडला.
लालपरीचा सन्मान: रितेश देशमुख यांनी यावर आनंद व्यक्त करत सांगितले की, "माझे वडील (विलासराव देशमुख) यांनीही एसटीने प्रवास केला आहे आणि लहानपणी मीही एसटीने प्रवास केला आहे. त्यामुळे हे काम माझ्यासाठी खूप खास आहे". यापूर्वी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी एसटीचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे.