सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 राजकारण

राघव चड्ढांचा ‘आप’ला रामराम; भाजपमध्ये प्रवेशाचा दावा, 8 खासदार सोबत असल्याचे वक्तव्य

डिजिटल पुणे    24-04-2026 16:42:03

दिल्ली : राज्यसभेतील ‘आप’चे प्रमुख नेते राघव चड्ढा  यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याचा दावा केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यसभेतील ‘आप’च्या दोन-तृतीयांश खासदारांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला असून ते लवकरच भाजपमध्ये सामील होणार आहेत.

चड्ढा यांनी आपल्या वक्तव्यात पक्षावर गंभीर टीका करत म्हटले की, ‘आप’ने मूळ विचारसरणी आणि तत्त्वांपासून दूर जात वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिले आहे. “मी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले, पण आता मी चुकीच्या ठिकाणी असल्याची जाणीव झाली,” असे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी 2 एप्रिल रोजी ‘आप’ने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले होते. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयानंतर चड्ढा यांनी आपला आवाज दाबला गेल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती.

चड्ढा यांच्या मते, त्यांच्या सोबत संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग आणि अशोक मित्तल असे काही खासदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, संविधानातील तरतुदीनुसार दोन-तृतीयांश सदस्य एकत्र आल्यास पक्षांतर शक्य आहे.

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अंमलबारी संचालनालयाने 15 एप्रिल रोजी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले होते. दिल्लीहून ईडीची पथके जालंधर येथील त्यांच्या घरी, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) आणि गुरुग्रामसह इतर ठिकाणी छापेमारीसाठी आली होती. गुरुग्रामच्या सायबर पार्कमधील दोन टॉवर्समधील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. याच इमारतीत अशोक मित्तल यांचे मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसचे कार्यालय आहे. एक कार्यालय तळमजल्यावर, तर दुसरे टॉवरच्या चौथ्या मजल्यावर आहे. 


 Give Feedback



 जाहिराती