सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 शहर

पुण्यात महिला धोरणांवर चर्चासत्र : 'धोरण कुठवर आलं गं बाई' !यशवंतराव चव्हाण सेंटर,पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने २८ एप्रिल रोजी आयोजन

डिजिटल पुणे    27-04-2026 10:53:50

पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर,पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने मंगळवार, दि.२८ एप्रिल २०२६ रोजी 'धोरण कुठंवर आलं गं बाई' या महिला धोरणावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, गांजवे चौक, पत्रकार भवनाजवळ येथे सकाळी १०.३० ते  दुपारी १ या वेळेत हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले  आहे. या चर्चासत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  किरण मोघे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण, 'मिळून साऱ्याजणी' नियतकालिकाच्या  संपादिका गीताली वि.मं. आणि महिलांशी संबंधित विषयांवर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.यशवंतराव चव्हाण  सेंटर,पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने अंकुश काकडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.महिला धोरणांच्या सक्षम अंमलबजावणीसाठी या चर्चासत्रात सामील होण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.   

आतापर्यंत राज्यात चार महिला धोरणांची अंमलबजावणी झाली. त्यात बऱ्यापैकी यश आले. पण काही बाबींच्या अंमलबजावणीत आव्हाने येत आहेत. ही आव्हाने आणि त्यावर उपाय या अनुषंगाने चव्हाण सेंटरच्या महिला विभागातर्फे महिला धोरणांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये 'धोरण कुठवर आलं गं बाई'! या नावाने ही चर्चासत्र घेण्यात येत आहेत. महिला विषयांवर काम करणाऱ्या स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, धोरण पातळीवर काम करणारे कार्यकर्ते या चर्चासत्रात चर्चा करतात.या चर्चासत्रांची सुरुवात गुरुवार, ५ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील साहित्य मंदिर सभागृहात झाली. विभागवार चर्चासत्रांची सुरुवात मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथून झाली. मराठवाड्यातील चर्चासत्रांमध्ये महिला सुरक्षा, महिला शेतकरी, संपत्तीतील अर्धा वाटा, एकल महिला, स्वच्छतागृह, महिला-पुरुष लिंगदर इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती