पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘कृष्ण रंग’ हा भगवान श्रीकृष्णावर आधारित विविध बंदिशी आणि रचनांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि.२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका डॉ. रेवा नातू यांच्या शिष्यवर्गातील कलाकार सहभागी होणार आहेत. यात मृणाल धोंगडे, सायली भाटे, कृतिका महाशब्दे, अनुजा वारे - महाजन, मल्हार पटवर्धन, शिवानी पेठकर, अनुश्री मुजुमदार, सई क्षीरसागर, आसावरी बापट, सागर सांभारे (हार्मोनियम), अनिकेत पंडित (तबला) आणि श्रावणी बिनिवाले (निवेदन) यांचा समावेश आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २८९ वा कार्यक्रम आहे. प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली .