सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 शहर

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 'एआययू'च्या १०० व्या वार्षिक महासभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन.

डिजिटल पुणे    28-04-2026 16:15:59

पुणे : महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आज पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 'असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्' (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे दिमाखदार उद्घाटन झाले. २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” हा आहे.

भारतीय विद्यापीठ संघाच्या (AIU) या शताब्दी परिषदेसाठी देशभरातून ३०० हून अधिक कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक कुलगुरूंचे आणि पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मा. डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे,   मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे, मा. डॉ. सौ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे,  मा. डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून पाहुण्यांचे स्वागत केले

या उद्घाटन प्रसंगी मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष व कानपूर विद्यापीठाचे कुलगुरू - मा. प्रा. विनय कुमार पाठक,  सरचिटणीस आणि सदस्य सचिव - डॉ. सौ. पंकज मित्तल,  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार आणि देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते 'युनिव्हर्सिटी न्यूज'चा विशेषांक, "असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्: अ सेंच्युरी ऑफ इव्होल्युशन, ट्रान्सफॉर्मेशन अँड लीडरशिप" आणि "ट्रान्सफॉर्मेटिव्ह हायर एज्युकेशन @२०४७" या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपालांचे प्रतिपादन: आपल्या भाषणात राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा म्हणाले की, "भारतीय विद्यापीठ संघाला (AIU) देशातील थोर नेत्यांचे मार्गदर्शन लाभले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. 'विकसित भारत २०४७' च्या प्रवासात नवोपक्रम (Innovation) आणि संशोधन केंद्रस्थानी असेल. विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानी न होता समाजात संधी निर्माण करणारे आणि समस्या सोडवणारे नागरिक बनावे, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे. डॉ. डी. वाय. पाटीलजींच्या शैक्षणिक दूरदृष्टीचा वारसा हे विद्यापीठ समर्थपणे पुढे नेत आहे, याचा मला आनंद वाटतो." राज्यपालांनी 'जय जवान, जय किसान' ते 'जय विज्ञान' आणि 'जय अनुसंधान' या प्रवासाचा उल्लेख करत नाविन्यपूर्ण संशोधनावर भर दिला. उच्च शिक्षणासाठी ५० टक्के प्रवेश प्रमाण गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पर्यावरणपूरक विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रगत तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश यावरही श्री.वर्मा यांनी भर दिला. तसेच  परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) म्हणाले, "आजच्या काळात शिक्षणाने केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे. चारित्र्य आणि सचोटी हेच खऱ्या गुणवत्तेचे गमक आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल राखूनच आपण देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो." ते पुढे म्हणाले ही परिषद भारतीय मूल्यांवर आधारित आणि जागतिक बदलांशी सुसंगत अशा उच्च शिक्षणाची नवी दिशा निश्चित करेल, असा विश्वास व्यक्त केला. 


 Give Feedback



 जाहिराती