सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आंसगावकरांची मागणी
  • मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी 'टीईटी' परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
  • टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला
  • सख्ख्या भावाचाही सियाविरोधात जबाब; 'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं, तपासाला नवं वळण
 DIGITAL PUNE NEWS

‘टेक-वारी’ अंतर्गत ‘टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नादमाधुर्याचा आनंद

डिजिटल पुणे    04-05-2026 17:11:58

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक–वारी २.० अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी–कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अधिकारी–कर्मचाऱ्यांनी ढोलकी, संबळ या वाद्यांच्या स्वरनादाचा आनंद घेतला.मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित तालरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकी–संबळच्या ठेक्यांनी परिसर दणाणून गेला. कलाकार निलेश परब (ढोलकी–संबळ वादक) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी वादक) यांनी आपल्या सादरीकरणातून तालरंगाची रंगत अधिक खुलवली.तालरंग कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनाच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीस उपस्थित अधिकारी–कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

टेक वारी २.० या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. तसेच तालरंगची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात ढोलकी, ढोल, संबळ, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने गोंधळगीत व कोळीगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.तालरंग या कार्यक्रमास मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती