सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 विश्लेषण

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जूनला भारतात; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनाची घोषणा

डिजिटल पुणे    01-06-2026 17:19:29

नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या सोशल मीडिया व्यंगात्मक उपक्रमाचे संस्थापक अभिजीत दीपके 6 जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ‘कॉकरोच इज बॅक’ असा संदेश देत दीपके यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.

सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेत असलेले अभिजीत दीपके यापूर्वी आम आदमी पक्षासाठी सोशल मीडिया रणनीतीकार म्हणून कार्यरत होते. विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत.

दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे एक्स (पूर्वीचे ट्विटर) खाते राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव 21 मे रोजी ब्लॉक करण्यात आले होते. या कारवाईविरोधात दीपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि एक्सकडून उत्तर मागवले असून पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे.

सीजेपी हा राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर व्यंगात्मक भाष्य करणारा डिजिटल उपक्रम असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. खाते पूर्णपणे बंद करण्याऐवजी आक्षेपार्ह पोस्टवरच कारवाई व्हायला हवी, अशी त्यांची भूमिका आहे. सध्या या प्रकरणाकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती