सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 विश्लेषण

केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा

डिजिटल पुणे    04-06-2026 14:55:26

केरळ : केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला असून, पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची हजेरी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडू, कर्नाटक तसेच ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात लवकरच मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, विदर्भातील नागरिकांना मान्सूनसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सामान्यतः 15 जूनच्या सुमारास विदर्भात मान्सून पोहोचतो. तोपर्यंत या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून, 10 जूननंतर उष्णतेत काहीशी घट होऊ शकते.

हवामान विभागाने वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून अवकाळी स्वरूपाचा असेल, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती