सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
  • लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
  • मान्सून पुन्हा सक्रिय! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
 विश्लेषण

मोठी बातमी :BCCI चे धक्कादायक निर्णय! श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाची धुरा, सूर्यकुमार यादव संघाबाहेर; वैभव सूर्यवंशीला मोठी संधी

डिजीटल पुणे    06-06-2026 14:28:47

नवी दिल्ली : आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा करण्यात आली असून, बीसीसीआयने घेतलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांनी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रेयस अय्यर याची भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, आतापर्यंत संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले आहे. तसेच युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्रथमच राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे.

सूर्यकुमार यादवने भारतीय टी-20 संघासाठी फलंदाज आणि कर्णधार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वाच्या मालिका जिंकल्या. मात्र आगामी मालिकांसाठी निवड समितीने नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवत संघात मोठे बदल केले आहेत.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरसाठी हा निर्णय कारकिर्दीतील मोठा टप्पा मानला जात आहे. गेल्या काही हंगामांत देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडे आता भारतीय टी-20 संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. वनडे संघातील महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर आता तो टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

याशिवाय, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आयपीएल 2026 मध्ये दमदार फलंदाजी करत त्याने सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच्या आक्रमक खेळीमुळे निवड समितीने त्याला थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जवळपास समान संघाची निवड करण्यात आली असून, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी काही अतिरिक्त बदल करण्यात आले आहेत. आता नव्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी कशी राहते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती