सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मोठी बातमी : 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
  • सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
  • उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट अदृश्य होत जाणं हा संजय राऊतांचा भीम पराक्रम, मंत्री जयकुमार गोरेंचा टोला
  • खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
 विश्लेषण

भाग्यश्री वटोरे यांच्याकडून गोविंदस्मृती स्मार्ट ग्रंथालयाला ५०० पुस्तकांची भेट; वाचन संस्कृतीला मिळाला नवा हातभार

गजानन मेनकुदळे    22-06-2026 12:39:45

पुणे : वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने बीटीसीसीचे संस्थापक-संचालक व मास्टर ट्रेनर भाग्यश्री वटोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील ब्राह्मणपूर येथील गोविंदस्मृती स्मार्ट ग्रंथालयाला ५०० पुस्तके भेट दिली. स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक आणि विविध विषयांवरील या पुस्तकांचा लाभ विद्यार्थ्यांसह वाचनप्रेमींना होणार आहे.यावेळी  सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे उपस्थित होते.

हे ग्रंथालय तरुण अभियंता कै. गोविंद लांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे बंधू विजय लांडे यांनी सुमारे १५ लाख रुपये स्वखर्चातून उभारले आहे. ग्रामीण भागात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे, हा या ग्रंथालयामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी भाग्यश्री वटोरे यांनी सांगितले की, वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही मोठी मदत होते. आतापर्यंत त्यांनी हजारो गरजू विद्यार्थी, अनाथ आश्रमातील मुले तसेच विविध ग्रंथालयांना पुस्तके भेट दिली असून, ऑनलाइन शिक्षणासाठी अनाथ मुलांना लॅपटॉपचाही पुरवठा केला आहे.गोविंदस्मृती स्मार्ट ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांसह विविध विषयांवरील साहित्य उपलब्ध असून, भाग्यश्री वटोरे यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्याचा मोठा लाभ होणार आहे.

या पुस्तकांमुळे बीडमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक व सर्वसाधारण ज्ञानवृद्धीसाठी मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचून वाचन संस्कृती जोपासावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भाग्यश्री वटोरे यांनी यापूर्वीही हजारो गरजू विद्यार्थ्यांना, अनाथ आश्रमातील मुलांना तसेच विविध ग्रंथालयांना पुस्तके भेट दिली आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःचा लॅपटॉपही भेट दिला होता.बीड जिल्ह्यातील बरणापूर येथील गोविंदस्मृती स्मार्ट ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षा व इतर वाचनासाठी उपयुक्त अशी एकूण ५०० पुस्तके भेट देत भाग्यश्री वटोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती