सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 शहर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

डिजिटल पुणे    17-07-2026 11:02:43

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतीपत्र तसेच तामिळनाडू विधानसभा शोक प्रस्तावाची प्रत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रशासनाच्यावतीने आज बारामती येथे सुपूर्द करण्यात आली.यावेळी उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी स्मृती पत्राचे तसेच तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी शोक प्रस्तावाचे वाचन केले.यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, दौंडचे उप विभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडस, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

 

 


 Give Feedback



 जाहिराती