सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 शहर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मंदिर परिसरात १०० वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

गजानन मेनकुदळे    25-07-2026 11:39:44

धायरी : वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि झपाट्याने होत असलेली वृक्षतोड या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी धायरी येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात अनुलोम सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रजातींच्या १०० वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.

या उपक्रमात देववृक्षांसह काजू, आवळा, आपटा, करंज तसेच पर्यावरणासाठी उपयुक्त अशा अनेक देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. भविष्यात हा परिसर अधिक हिरवागार व्हावा, जैवविविधतेला चालना मिळावी आणि नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण लाभावे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात अनुलोम संस्थेच्या जनसेविका सौ. नयन चव्हाण, अनुलोम मित्र व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे आणि दिलीप रायकर यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सध्या वाढत चाललेल्या वृक्षतोडीमुळे निर्माण होणारे पर्यावरणीय असंतुलन, तापमानवाढ, पाण्याची समस्या आणि जैवविविधतेवर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "फक्त वृक्ष लावून चालणार नाही, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे पालकत्व स्वीकारले, तर हजारो झाडे जगू शकतात आणि पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी होईल."

कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला. लावलेल्या प्रत्येक रोपाला नियमित पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्याची वाढ होईपर्यंत काळजी घेणे, अशी प्रतिज्ञाही उपस्थितांनी केली.

या वृक्षारोपण मोहिमेत अनुलोम मित्र-मैत्रिणी, धायरी परिसरातील नागरिक, विविध सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

समाजातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेत वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि समृद्ध पर्यावरण देणे शक्य होईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला


 Give Feedback



 जाहिराती