सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
  • मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
 जिल्हा

उरणमध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास तीव्र विरोध; तहसीलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन

डिजिटल पुणे    28-07-2026 10:59:34

उरण : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), उरण तालुक्याचे अध्यक्ष संजय गायकवाड  यांच्या  नेतृत्वाखाली आज, दि. २७ जुलै २०२६ रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. यावेळी उरणचे तहसीलदार तसेच उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन व पत्रे सादर करण्यात आली.

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेल्या घटनात्मक आरक्षण व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करून अनुसूचित जाती समाजामध्ये तेढ व फूट निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका मांडली. अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क अबाधित ठेवून सामाजिक न्यायाचे संरक्षण व्हावे तसेच आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित समाजघटकांशी व्यापक चर्चा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी उरण तालुक्याचे अध्यक्ष संजय गायकवाड यांच्यासह  बीएसपी चे तालूका अध्यक्ष सुनील गायकवाड, आरपीआयचे  उरण शहर अध्यक्ष दिनेश गायकवाड, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष तथा उपाध्यक्ष खालीद शेख, खजिनदार परशुराम शिवसरण, सचिव सुनिल कोल्हे, युवक तालुका अध्यक्ष सुयोग गायकवाड,  कामगारे नेते नरेश कोळी, बौद्ध पंचायत सरचिटणीस सुनिल जोशी, कुणाल म्हात्रे, संकेत पाटील, शैलेश मुळके, जयभीम झलकी, नूर शेख, प्रशांत भागा, देवेंद्र कोळी, मनीष कातकरी, सतीश कसबे, सुनिल साबळे, विशाल साबळे, अंबादास रोडे तसेच उरण तालुक्यातील अनेक भीम अनुयायी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती