सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
  • मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
 विश्लेषण

राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा;हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी

डिजिटल पुणे    28-07-2026 11:13:34

मुंबई : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

अलर्ट नुसार २७ जुलै २०२६ रोजी रायगड, रत्नागिरी , सातारा जिल्ह्यातील घाट परिसर , आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर घाट परिसर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. २८ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, जळगाव, पुणे घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२९ जुलै २०२६ रोजी गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर नाशिक, नाशिक घाट परिसर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग या भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ३० जुलै २०२६ रोजी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

वीजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, झाडाखाली उभे राहणे टाळावे तसेच शेतकरी व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती