सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
  • कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
  • पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
  • रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
 जिल्हा

दिवेआगर येथे सुसज्ज ॲक्वेरियम उभारणीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे

डिजिटल पुणे    29-07-2026 14:37:20

मुंबई : रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटकांच्या आकर्षणात भर घालण्यासाठी अत्याधुनिक व सुसज्ज ॲक्वेरियम उभारण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिवेआगर परिसरातील पर्यटन विकासासंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

ॲक्वेरियम प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून तो तातडीने शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तसेच, प्रकल्पाचे नियोजन करताना पर्यटकांच्या गरजा, स्थानिक पर्यटनाला चालना आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दिवेआगरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

बैठकीस रायगड जिल्हा नियोजन अधिकारी, पर्यटन संचालनालयाचे संचालक, कार्यकारी अभियंता तसेच पर्यटन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी दिवेआगरचा सागरी किनारा हा राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक असून, वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देत असल्याचे नमूद करण्यात आले. पर्यटकांना अधिक दर्जेदार व नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिवेआगर येथे आधुनिक व सुसज्ज ॲक्वेरियम उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती