सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 राज्य

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण ;महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

डिजिटल पुणे    03-08-2026 12:20:56

नवी दिल्ली : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे.केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्यास आणि निधी नियोजन अधिक सक्षमपणे करण्यास मदत होणार आहे.महाराष्ट्राला प्राप्त ७ हजार २२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती