सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू
 क्राईम

पुण्यात संतापजनक प्रकार! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप; तिघांविरोधात गुन्हा

डिजिटल पुणे    04-08-2026 18:10:34

पुणे : पुणे शहरातील लोहगाव परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ जुलै रोजी लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात घडली. फिर्यादी अल्ताफ नबी शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी जैनाब आणि तिची भावजय सानिया शेख यांच्यात काही कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून सानिया शेख हिने घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे.घटनेनंतर बाळाच्या आईने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तक्रारीमध्ये आरोपींनी या घटनेची माहिती बाहेर दिल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर दोन आरोपींनीही फिर्यादीला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी सानिया शेख आणि इतर दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती