सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू
 क्राईम

ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या सीएचा दुर्दैवी मृत्यू; सुसाइड नोटमधून आर्थिक संकटाचे कारण उघड

डिजिटल पुणे    07-08-2026 12:29:38

हैदराबाद : तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यात ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या 33 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत आर्थिक नुकसान आणि वाढत्या कर्जामुळे तीव्र मानसिक तणावात असल्याचा उल्लेख आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण हा सिद्धीपेटचा रहिवासी असून हैदराबादमधील एका नामांकित खासगी कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होता. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. कुटुंबीयांनी अनेकदा आर्थिक मदत करून त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाढते कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वतःचा फ्लॅटही विकावा लागल्याचे तपासात समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी तो सिद्धीपेटमधील एका हॉटेलमध्ये थांबला होता. बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडल्यानंतर त्याचा मृतदेह आढळला.

घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीत जुगारामुळे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीचा आणि वाढत्या कर्जबाजारीपणाचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऑनलाइन जुगाराच्या वाढत्या व्यसनाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती