पुणे : न्यूरो लिंग्विस्टिक प्रॉग्रॅमिंग प्रॅक्टिशनर्स कोर्स(एनएलपी) या अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीचा प्रमाणपत्र प्रदान समारंभ बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र(कर्वे नगर) येथे नुकताच उत्साहात पार पडला. हा अभ्यासक्रम 'पाथ पायलट' संस्था आणि बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.डॉ.श्रद्धा वेर्णेकर,इरा चिड्डरवार,करुणा लगाडे,गिरीश देगावकर,रजनी कुऱ्हाडे,डॉ. शर्मिला धोंडकर,सायली पाटील आणि प्राची भोसले यांना अमेरिकन बोर्ड ऑफ ऑफ एनएलपी मान्यताप्राप्त 'सर्टिफाईड एनएलपी प्रॅक्टिशनर' हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तज्ज्ञ प्रशिक्षक स्वाती उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.
व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रभावी संवाद कौशल्यांच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या पाथ पायलट संस्थेतर्फे या समारंभाचे आयोजन करण्यात आले. न्यूरो लिंग्विस्टिक प्रॉग्रॅमिंग ही संवादकौशल्य,विचारपद्धती,भावनिक व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास यांवर आधारित प्रभावी प्रशिक्षण पद्धती असून, व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते.या कार्यक्रमात सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या वैयक्तिक,व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.