सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''
 क्राईम

पुण्यात मध्यरात्री तरुणांचा धिंगाणा; दारूच्या नशेत भरधाव कारमधून धोकादायक स्टंट, चौघांना अटक

डिजिटल पुणे    12-08-2026 13:26:15

पुणे : पुण्यात मध्यरात्री भरधाव कारमधून धोकादायक स्टंटबाजी करत रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर डेक्कन पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोड परिसरात काही तरुणांनी कारच्या काचा उघड्या ठेवून आणि वाहनाबाहेर शरीराचा काही भाग काढत धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी केली. हातात बिअरच्या बाटल्या घेऊन त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. लॉ कॉलेज परिसरातून नळ स्टॉपमार्गे डेक्कनच्या दिशेने जाताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर संबंधित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हे तरुण हरियाणाहून पुण्यात मित्रांना भेटण्यासाठी आले होते. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांनी मद्यपान केले आणि त्यानंतर रस्त्यावर अशा प्रकारे धोकादायक वर्तन केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे वाहन चालवणे आणि स्टंटबाजी करणे इतरांच्या जीवितासही धोका निर्माण करू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

FAQs

1. पुण्यात नेमका काय प्रकार घडला?

भरधाव कारमधून काही तरुणांनी धोकादायक स्टंटबाजी करत रस्त्यावर गोंधळ घातला.

2. घटना कुठे घडली?

सेनापती बापट रोड, लॉ कॉलेज, नळ स्टॉप आणि डेक्कन परिसराच्या मार्गावर हा प्रकार घडला.

3. पोलिसांनी किती जणांना अटक केली?

डेक्कन पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

4. हे तरुण कुठून पुण्यात आले होते?

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण हरियाणाहून मित्रांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते.

5. पोलिसांपर्यंत घटना कशी पोहोचली?

स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत तपास सुरू केला.

6. नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन काय आहे?

रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी किंवा बेजबाबदार वाहनचालक आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती