सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''
 शहर

महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घ्या : प्राचार्य डॉ .तुषार शितोळे

डिजिटल पुणे    12-08-2026 16:57:20

नसरापूर (पुणे): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'स्वागत व महाविद्यालय ओळख' (इंडक्शन प्रोग्रॅम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी विद्यार्थ्यांनी दररोज महाविद्यालयात येऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता , सामाजिक जबाबदारी  आणि बौद्धिक क्षमता वाढवून  महाविद्यालयाचे, आपल्या कुटुंबाचे आणि स्वतःचे नाव उंचीवर घेऊन जाऊन एक चांगला नागरिक व्हावे आणि महाविद्यालयीन जीवनाचा आनंद लुटावा असे मत व्यक्त केले .

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. आर. बी. ढाकणे यांनी केले.

महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या हस्ते विशेष स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध विभागांची आणि सोयीसुविधांची ओळख करून देणे हा होता. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. एस. जी. घाडगे यांनी विद्यार्थी विकास मंडळ, स्कॉलरशिप, आय.जी.सी. आणि अँटी रॅगिंग संदर्भात माहिती दिली. प्रा. भगवान गावित यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देऊन ग्रंथालय व परीक्षा विभाग यांची सविस्तर माहिती दिली, तर प्रा. डॉ. जी. ए. आवटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती दिली. प्रा. एम. डी. कोळपे (ट्रेनिंग प्लेसमेंट आणि स्पर्धा परीक्षा), प्रा. एस. जी. रोडे (आविष्कार-संशोधन विभाग), आणि प्रा. एस. व्ही. लांडगे (जिमखाना व सांस्कृतिक विभाग) यांनी आपापल्या विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच, प्रा. जे. ई. गायकवाड (वाणिज्य, स्टडी टूर/इंडस्ट्रियल व्हिजिट, फिल्ड प्रोजेक्ट/ओ.जे.टी.), प्रा. डॉ. जे. डी. शेवते (कला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020) आणि श्री. शिवाजी सोनवणे (प्रशासकीय माहिती) यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयात अजित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती त्या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विद्यार्थ्यांचे अभिनंदन मा .प्राचार्य यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रा. व्ही. एस. कोंडे यांनी मानले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. संदीप लांडगे यांनी पार पाडली.

 

 


 Give Feedback



 जाहिराती