सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू; आणखी काही जण ढिगाऱ्याखाली, गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला
  • सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''
 शहर

चौपन्न खड्डे म्हणता, मग हा अख्खा माणूस गिळणारा खड्डा कुणाच्या कारभाराचा? अप्पर इंदिरानगरमधील महाकाय खड्ड्यावर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे संतप्त

डिजिटल पुणे    12-08-2026 17:34:48

पुणे : अप्पर इंदिरानगर परिसरातील अख्खा माणूस आत जाईल एवढा प्रचंड खड्डा पडल्याचा व्हिडिओ शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत पुणे महापालिका प्रशासनाला संतप्त सवाल केला आहे. “पुणे शहरात केवळ ५४ खड्डे असल्याचा दावा महापालिका करते, मग अप्पर इंदिरानगरमधील हा एवढा मोठा खड्डा कुणाच्या मोजणीत आला नाही? कागदावर ५४ खड्डे दाखवून प्रत्यक्षातील भयावह वास्तव झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? पुणेकरांच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे का?” असा सवाल भानगिरे यांनी केला.

रस्त्यांची कामे वारंवार निकृष्ट ठरणे, खड्डे पुन्हा-पुन्हा पडणे आणि त्याच कंत्राटदारांना कामे मिळणे यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, याचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. “महापालिकेने आकडेवारीच्या खेळातून बाहेर येऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे आणि शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवावेत. अन्यथा पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कारभाराविरोधात शिवसेनेचा महापालिका दालनात तीव्र उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला.


 Give Feedback



 जाहिराती