सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 क्राईम

AI ला धक्कादायक प्रश्न; अमेरिकेत भारतीय वंशाच्या १७ वर्षीय मुलावर आई-भावाच्या हत्येचा आरोप

डिजिटल पुणे    13-08-2026 12:55:24

अमेरिका : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील ॲक्टन येथे भारतीय वंशाच्या १७ वर्षीय मुलावर आपल्या आई आणि धाकट्या भावाच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. अर्जुन अरविंद असे आरोपीचे नाव असून, रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी त्याला बुधवारी ताब्यात घेतले.

अर्जुनवर ४५ वर्षीय आई सुधा वेंकटेशन आणि १४ वर्षीय भाऊ सिद्धार्थ अरविंद यांच्या हत्येप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, तो कुटुंबातील सदस्यांना इजा करण्याबाबत AI कडे प्रश्न विचारत असल्याचेही समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

अर्जुन हा ॲक्टन-बॉक्सबरो रिजनल हायस्कूलचा विद्यार्थी आहे. मंगळवारी घरात आई आणि भावावर हल्ला केल्यानंतर तो आईच्या कारमधून घटनास्थळावरून निघून गेल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एक ट्यूटर शिकवणीसाठी त्यांच्या घरी पोहोचली. मात्र, घरात प्रवेश न झाल्याने तिने अर्जुनच्या वडिलांशी संपर्क साधला. कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याने वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घराची पाहणी केली असता सुधा वेंकटेशन आणि सिद्धार्थ हे दोघेही मृतावस्थेत आढळले. दोघांच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण आणि त्यासाठी वापरलेले साधन याबाबत वैद्यकीय तपासणीनंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

आरोपीवर कोणते आरोप?

पोलिसांनी अर्जुनवर दोन हत्येचे गुन्हे, कुटुंबातील सदस्यावर हल्ल्याचे दोन गुन्हे, मारहाणीचे दोन गुन्हे तसेच मोटार वाहनाच्या अनधिकृत वापरासह वाहन चोरीचे आरोप ठेवले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास ॲक्टन पोलिस आणि मिडलसेक्स डिस्ट्रिक्ट ॲटर्नी कार्यालयाकडून सुरू आहे. आरोपीवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे अद्याप बाकी आहे.


 Give Feedback



 जाहिराती