सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 शहर

ईशा पारखी यांची जर्मनीतील ‘आर्टहाउस सिनेमा ट्रेनिंग’साठी निवड

डिजिटल पुणे    13-08-2026 15:07:52

पुणे : मूळच्या पुण्याच्या मात्र सध्या अमेरिकेत कार्यरत  असलेल्या ईशा पारखी यांची बर्लिन, जर्मनी येथे आयोजित २३ व्या ‘आर्टहाउस सिनेमा ट्रेनिंग’साठी निवड झाली आहे. आर्ट-हाउस आणि स्वतंत्र चित्रपटगृहांना पाठबळ देणाऱ्या ‘सीआयसीएई’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट क्षेत्रातील आपल्या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करणाऱ्या ईशा सध्या न्यूयॉर्कमधील ‘जेकब बर्न्स फिल्म सेंटर’मध्ये चित्रपट प्रदर्शन आणि मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. तेथे  वर्षाला ४०० हून अधिक चित्रपटांच्या प्रदर्शनाशी संबंधित काम पाहतात. 

ईशा पारखी यांच्या कामाचा प्रमुख भर प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे, नवीन प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करणे आणि चित्रपट व समाजातील लोक यांच्यात नाते निर्माण करणे यावर आहे. त्यांच्या या कामामुळे त्यांना अमेरिकेतील प्रमुख चित्रपट महोत्सव आणि व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. २०२५ मध्ये त्यांना सनडान्स फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्यासाठी ‘फिल्म फेस्टिव्हल अलायन्स’ची प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच जून २०२६ मध्ये शिकागो येथे स्वतंत्र चित्रपटगृहांसाठी आयोजित ‘आयएनडी/ईएक्स’ परिषदेत त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

पुण्यात शिक्षण घेत असतानाच चित्रपटांविषयीची आवड अधिक दृढ झालेल्या ईशा यांनी पुढे अमेरिकेत लिबरल आर्ट्सचे शिक्षण घेतले. मार्केटिंग, समाजशास्त्र आणि चित्रपट या तीन क्षेत्रांचा एकत्रित अभ्यास करण्याची संधी त्यांना अमेरिकेत मिळाली.


 Give Feedback



 जाहिराती