सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवर राज ठाकरे संतापले; ‘ज्यांना सत्ता दिली, त्यांनाच जाब विचारा’
  • शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
 क्राईम

कंबरदुखीमुळे पत्नीने नकार दिला; संतापलेल्या पतीचा जीवघेणा हल्ला, मुलगीही जखमी

डिजिटल पुणे    14-08-2026 16:17:24

पुणे : कंबरदुखीचा त्रास होत असल्याने पत्नीने पतीसोबत जवळीक साधण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात घडली. आरोपीने पत्नीचा गळा दाबून तसेच चाकूने तिच्या कमरेवर वार केल्याचा आरोप आहे. आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीवरही चाकूने हल्ला करण्यात आल्याने ती जखमी झाली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी ३५ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास संबंधित महिला घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. कंबरदुखीचा त्रास असल्याने त्या औषधे घेत होत्या. त्याचवेळी पतीने त्यांना सोबत येण्यास सांगितले. मात्र, मुले जागी असल्याने आणि कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे सांगत महिलेने नकार दिला.

पत्नीने नकार दिल्याने पती संतापला आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने पत्नीला धमकावत तिचा गळा दाबल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चाकूने तिच्या कमरेवर वार करून तिला जखमी करण्यात आले.

आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलीवरही हल्ला

आईवर हल्ला होत असल्याचे पाहून मुलगी तिला वाचवण्यासाठी पुढे आली. त्यावेळी आरोपीने तिच्यावरही चाकूने वार केल्याने ती जखमी झाली. दोघींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.फिर्यादी महिलेने पतीकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे. घटनेनंतर महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे कौटुंबिक वादातून हिंसक प्रकार घडल्याचे पुन्हा समोर आले असून, परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती