सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका
  • राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; “धमकावलं, घाबरवलं तरी लढत राहा” — कार्यकर्त्यांना संदेश
  • मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
 जिल्हा

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातात झाडू पाहून अभिजीत दिपके संतापले; शिक्षकांना सुनावलं, म्हणाले, “मुलं शिकायला येतात, साफसफाई करायला नाही!”

डिजिटल पुणे    18-08-2026 15:51:16

हिंगोली : ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील ढेगस गावातील सरकारी शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी वर्गातील चिमुकले विद्यार्थी झाडू मारताना दिसल्याने दिपके यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षकांना जाब विचारला.

शाळेची पाहणी करत असताना एका वर्गात लहान विद्यार्थी साफसफाई करत असल्याचे दिपके यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विद्यार्थ्यांना, “तुम्हाला झाडू मारायला कोणी सांगितले?” असा प्रश्न केला. यावर विद्यार्थ्यांनी स्वतःहून झाडू मारत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला. मात्र, यावर दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.“लहान मुलं स्वतःहून वर्गात झाडू मारत नाहीत. ही मुलं शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्याकडून साफसफाई करून घेणे योग्य नाही,” असे सांगत दिपके यांनी शिक्षकांना सुनावले.तसेच विद्यार्थ्यांनाही त्यांनी यापुढे शाळेत झाडू न मारण्याच्या सूचना दिल्या. “तुम्ही फक्त शिकण्यासाठी शाळेत या. साफसफाई करण्याची गरज नाही. पुन्हा असं घडलं तर मला फोन करा,” असे दिपके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यानंतर दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेत कोणत्या सुविधांची गरज आहे, याची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी बाथरूम, वह्या-पुस्तके, पेन, गणवेश, फळा, बूट आणि शाळेचे दार यांसह विविध मागण्या मांडल्या.

दारू पिऊन शाळेत राहणारा मुख्याध्यापक अखेर निलंबित

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, लिंबाळा येथे अभिजीत दिपके यांनी भेट दिली होती. यावेळी मुख्याध्यापक विनोद कटके हे शाळेतच मद्यपान करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भातील व्हिडिओही दिपके यांनी समोर आणला होता.

संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिपके यांनी दिला होता. त्यानंतर दिपके हिंगोलीत दाखल होण्यापूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी विनोद कटके यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

या शाळेत आणखी चार शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही दिपके यांनी केली होती. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा झाल्यानंतर मागणीबाबत लेखी आश्वासन देण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे दिपके यांनी म्हटले आहे.


 Give Feedback



 जाहिराती