सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिन उत्साहात

डिजिटल पुणे    28-09-2026 14:55:41

पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यटन परिषदे मार्फत संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील भूगोल विभाग व ट्रॅव्हल ॲंड टुरिझम विभागातर्फे रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळच्या निवृत्त प्राचार्या डॅा. पुष्पा अर्कसाली यांच्या ‘आनंदी आणि शाश्वत पर्यटन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करत जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उपप्राचार्या डॅा. वंदना पिंपळे, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. चंदा हासे, कला शाखा समन्वयक व भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे, ट्रॅव्हल ॲंड टुरिझम विभाग समन्वयक प्रा. सुदर्शन लखदिवे, विभाग प्रमुख प्रा. सद्दाम घाटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आनंदी आणि शाश्वत पर्यटन’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. पुष्पा अर्कसाली यांनी पर्यटनाचा इतिहास उलगडत पर्यटनासाठी महत्वपूर्ण संस्कृती व भौगोलिक स्थान यावर भाष्य केले. तसेच अनोळखी ठिकाणी पर्यटन करत असताना स्थानिक लोकांची मदत घेणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत आनंदी पर्यटनासाठी पर्यटकाची मानसिकता यांचा सहसंबंध स्पष्ट केला. त्याचबरोबर राष्ट्रीय पर्यटन धोरणात नमूद शाश्वत व जबाबदार पर्यटनावर माहिती देत स्वदेश दर्शन, इको फ्रेंडली टुरिझम, कृषी व ग्रामीण पर्यटन, ऐतिहासिक वास्तू, शाश्वत पर्यटना समोर असलेली आव्हाने व समस्या इत्यादी बाबींवर विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना स्पष्ट करत यानिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल भूगोल व पर्यटन विभागाचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा. रमाकांत कसपटे, सुत्रसंचालन प्रा. स्नेहल आंब्रे तर आभार प्रदर्शन प्रा. सद्दाम घाटवाले यांनी केले. या कार्यक्रमाला भूगोल व पर्यटन विभागाचे सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. अनंत कदम, डॅा. राजेंद्र सरोदे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, डॉ. अक्षय कामठे, डॅा. नम्रता ढाले, डॉ. मनीषा खैरे, डॉ. नूतन नेवसे, प्रा. नेहा बावले, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती