सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; कंटेनरची टेम्पोला जोरदार धडक, दोन्ही वाहने दरीत कोसळली; चालकाचा मृत्यू

डिजिटल पुणे    28-09-2026 15:22:02

खंडाळा-बोरघाट : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा-बोरघाट परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर किलोमीटर क्रमांक ३९ जवळ मालवाहू कंटेनरने पुढे जाणाऱ्या टाटा टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या दरीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच विविध बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. कंटेनर खोल दरीत कोसळल्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, टाटा टेम्पोचा चालक मिराज शेख याचे या अपघातातून सुदैवाने प्राण वाचले. मात्र, टेम्पो दरीच्या भागात अडकून पडला. दोन्ही वाहने दरीत कोसळल्याने घटनास्थळी बचावकार्य आव्हानात्मक बनले होते.

अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग पथक, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, अ‍ॅफकॉन्स कंपनीचे पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसेच १०८ रुग्णवाहिका आणि HELP Foundationच्या सदस्यांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना केल्या. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती आहे.


 Give Feedback



 जाहिराती