सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 DIGITAL PUNE NEWS

जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका ;राज्य शासनाकडून रोख पारितोषिके जाहीर

डिजिटल पुणे    29-09-2026 17:25:50

मुंबई : चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्डस्किल्स शांघाय २०२६’ या जागतिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या पाच युवा कौशल्यवंतांनी भारताचे प्रतिनिधित्व करत देदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत एक रौप्यपदक आणि तीन ‘मेडलियन ऑफ एक्सलेन्स’ (उत्कृष्टता पुरस्कार) पटकावत र महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर नेले आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या युवा प्रतिनिधींनी मिळवलेले यश हे राज्याच्या कौशल्य विकास परिसंस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे अशा शब्दात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विशेष कौतुक केले आहे.

शांघाय येथे २२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित या स्पर्धेत जगभरातील ६८ देशांतील युवा कौशल्यवंत ६३ प्रकारच्या कौशल्यांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय संघात समाविष्ट असलेल्या महाराष्ट्राच्या पाच प्रतिनिधींनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये कोविड गंग्राडे याने ‘डिजिटल इंटरऍक्टिव्ह मिडिया’ प्रकारात रौप्यपदक पटकावले. तर खुशराज राठोड (आयटी नेटवर्क एडमिनिस्ट्रेशन), संपदा देसाई (केमिकल लेबोरेट्री तंत्रज्ञान) आणि तहसीन सुतार (ब्युटी थेरपी) यांनी ‘उत्कृष्टता पदक’ मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.याशिवाय, महाराष्ट्राच्या हर्ष पवार याने ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या ‘ग्लोबल स्किल चॅलेंजस २०२६’ मधील ‘थ्री-डी डिजिटल गेम आर्ट’ या प्रकारात रौप्यपदक पटकावून उल्लेखिनीय यश मिळवले.

विजेत्यांना रोख पारितोषिके जाहीर

जागतिक व राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या गुणवंतांसाठी राज्य शासनाकडून विशेष रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.शांघाय व ऑस्ट्रेलिया स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कोविड गंग्राडे आणि हर्ष पवार यांना प्रत्येकी ३ लाख रुपये तर उत्कृष्टता पदक विजेते: खुशराज राठोड, संपदा देसाई व तहसीन सुतार यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर केली आहेत.

शासनाच्या धोरणानुसार, जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासाठी ५ लाख, रौप्यसाठी ३ लाख, कांस्यपदकासाठी २ लाख आणि उत्कृष्टता पदकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. तर राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना अनुक्रमे १ लाख (सुवर्ण), ७५ हजार (रौप्य), ५० हजार (कांस्य) आणि २५ हजार रुपये (उत्कृष्टता) दिले जातात.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धकांसाठी प्रवास, निवास, भोजन, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि लॉजिस्टिकची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन , सीआयआय,डीव्हीईटी व विविध सेक्टर स्किल कौन्सिलच्या सहकार्याने हे यश शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती