पुणे : वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित मेडिकल कोडिंग परीक्षेत सागर तानाजी कांबळे यांनी ८० टक्के गुण मिळवत विशेष प्रावीण्यासह डिस्टिंक्शन प्राप्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सिंहगड रोड परिसरात आनंदाचे वातावरण असून, मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कोडिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत सागर कांबळे यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. अमेरिकन मेडिकल कोडर्समार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत त्यांनी मिळवलेले यश त्यांच्या अभ्यासातील सातत्य, समर्पण आणि गुणवत्तेची साक्ष देणारे आहे.
सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मेडिकल कोडिंगला विशेष महत्त्व प्राप्त होत असून, या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अशा महत्त्वाच्या परीक्षेत सागर यांनी मिळवलेले यश त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच आशादायी ठरणार आहे.
सागर तानाजी कांबळे यांच्या या यशाबद्दल सिंहगड रोड परिसरातील मित्रमंडळी, नातेवाईक आणि परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.मेहनत, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल सागर कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.