सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
  • आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
  • 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
  • दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा,
  • उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
 शहर

पुण्यात फटाके फोडण्यावर पोलिसांचे कडक निर्बंध! रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत आवाजाच्या फटाक्यांवर बंदी; रस्त्यावर फटाके फोडल्यास होणार कारवाई

डिजिटल पुणे    23-10-2026 17:55:53

पुणे : दिवाळीचा सण जवळ येत असताना पुणे पोलिसांनी फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच रस्त्यापासून १० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या फटाके विक्रीसाठी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत परवाने दिले जाणार आहेत. परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता येणार नाही. विक्री न झालेला शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे जमा करणे आवश्यक असेल. तसेच, तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विदेशी बनावटीच्या फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई करण्यात आली आहे.

आवाजाच्या फटाक्यांवर कडक निर्बंध

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांच्या आवाजावरही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यास बंदी आहे. तसेच, शंभरपेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर निर्बंध लागू आहेत. विशिष्ट प्रकारच्या ‘ॲटमबॉम्ब’च्या वापरावरही संबंधित नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे.

रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत

ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास मनाई असेल. या कालावधीत केवळ प्रकाश आणि रंग निर्माण करणारे बिनआवाजी फटाके तसेच नियमांनुसार परवानगी असलेले पर्यावरणपूरक ‘ग्रीन फटाके’ वापरण्याची मुभा असेल.रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालचा १०० मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात फटाके फोडण्यास मनाई राहणार आहे.

नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार

फटाके विक्री आणि वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता, स्फोटक कायदा १८८४ आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून ध्वनिप्रदूषण आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

शहरात कुठेही नियमबाह्य पद्धतीने फटाके फोडले जात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी सांगितले.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 24-10-2026 14:53:58

गणेशोत्सवात कायद्याची किती अंमलबझावणी केली किती मंडलावर खटले दाखल केले जाहेर का करत नाही कायदा सूव्यवस्थच्या नावाखाली मनमानी करायला परवानगी देउन मूक रहाणे होते का? परत उत्सव शांततेत पार पाडलेचे श्रेय घेताना जनाची नाही मनाची तर लाज वाटली पाहिजेना असो आत्ता तरी गणेशोउत्सव सारखा फौज फाटा न वापरता हद्दीतील पोलीस कर्मचार्यानी रात्री 8 ते12 गस्त घालावी फक्त दिवलीच्या दिवशी तक्रारीची वाट कशाला पहायची शहरात पोलीस चौक्या चौकडे आहे आम नागरिकाना आवाज येतो तर पोलीस कर्मचारी सूद्धा बहिरै तर निश्चित नाही खास दिवालीच्या दिवशी रस्त्यावर स्वयं स्फूरतेने गस्त घालून होणारे ध्वनी,वायू प्रदूषण रोखावे रस्ते कचरे मूक्त करण्यास प्राधान्य द्यावे ही कलकलीची विनंती

 Give Feedback



 जाहिराती