सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
  • पुण्यात दिवाळीत आगींचा भडका! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ९४ ठिकाणी अग्नितांडव; सहा वर्षांतील सर्वाधिक घटना
  • कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
  • सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
 जिल्हा

गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार योजनेला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    09-11-2026 18:15:00

नागपूर : ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जी गावे मदत करतील त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. सरपंचांनी मांडलेल्या सर्व सूचना व जलसंधारणाच्या प्रश्नासंदर्भात प्राधान्याने कामे सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.लोहारी सावंगा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधताना नरखेड तालुक्यातील भिष्णूरच्या सरपंच श्रीमती लताताई बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रथमच भेटत असल्याचे सांगताना गावातील प्रश्नासंदर्भात त्यांना निवेदन दिले आणि निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनाच मला निवेदनाच्या स्थळ प्रतिवर पोच द्यावी अशी मागणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना पोचपावती मागावी ही घटना प्रथमच घडत होती, परंतू त्या मागची भूमिका समजावून घेताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पोच देण्याची सूचना यावेळी केली.

सरपंच लताताई बागडे यांनी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख करताना जलसंधारणाच्या कामांमध्ये जी रिचार्ज शाफ्ट बसविले आहेत ती योग्य नसल्याची  मागणी केली, त्यासोबतच ग्रामस्तरावर  होणाऱ्या विविध कामासंदर्भात ग्रामपंचायतीला कल्पना नसल्यामुळे आणि विकासाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी कंत्राटदारही एकच नसल्याची व्यथा व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांबद्दल असलेल्या तळमळीची भावना लक्षात घेऊन यापुढे असे घडणार नाही, अशी ग्वाही दिली.

अटल भूजल योजनेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत तसेच नादुरुस्त कामांना दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी जागृतपणे काम करत आहेत. गावात पिण्याचे पाणी गुरांच्या चारा व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी समाधान व्यक्त केले.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 10-11-2026 09:11:10

नवीन नाटक जूनी घोषणा जनतेला किती दिवस येडे बनवणार 70 वर्ष कोन्ग्रेस ने भूल थापा देउन राज्य केले तूम्ही त्याच मार्गावर चीन कूठे आणी तूम्ही कोठै जरा लाजा बालगा

 Give Feedback



 जाहिराती