सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता
  • मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
 शहर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवणीतील गरजू कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप; शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

डिजिटल पुणे    23-11-2026 13:00:40

किनवट : दुष्काळाचे सावट लक्षात घेता, गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘आनंदाचा शिधा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत किनवट तालुक्यातील शिवणी येथे गरजू कुटुंबांना घरपोच शिधावाटप करण्यात आले.

नामदार हेमंत पाटील आणि सौ. राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणी-इस्लापूर सर्कलमधील शिवसेना कार्यकर्ते गजानन बच्चेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या माध्यमातून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक शिध्याचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमादरम्यान राजश्रीताई हेमंत पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना आपुलकीचा आधार देत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शक गंगाधरजी भुसीवाड मामा, हनमंतु भुसीवाड, ग्रामपंचायत शिवणीचे कर्मचारी दिनेश अष्टपैलू, गोविंद कार्लेवाड, धनंजय माने, चिंटू बालाजी एकाळे यांच्यासह गावातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला. संकटकाळात गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे आणि समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

जनसेवेचा ध्यास, माणुसकीचा विश्वास!

गरजूंच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या कार्याचे खरे समाधान! 

#AnandachaShidha #ShivSena #RajashriHemantPatil #HemantPatil #Kinwat #Shivni #Islapur #JanSeva #समाजसेवा #माणुसकी #जनसेवा


 Give Feedback



 जाहिराती