पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'गझल आख्यान' या विशेष गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे.
या मैफिलीचे सादरीकरण संगीत दिग्दर्शक डॉ. आशिष मुजुमदार यांचे असून 'मेहफिल-ए-गझल' या शीर्षकाखाली गझल आणि त्यापलीकडील संगीताचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. या मध्ये गायिका अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांचे गायन होणार आहे. त्यांना कीबोर्डवर निनाद सोलापूरकर, तबल्यावर अमोद कुलकर्णी आणि हार्मोनियमवर डॉ. आशिष मुजुमदार हे साथसंगत करणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा ३१४ वा कार्यक्रम असून प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.