सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 जिल्हा

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात समिती गठित – मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

डिजिटल पुणे    24-11-2026 11:23:21

मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात निर्देश दिले. त्यांच्या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष समिती गठित केली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील विषयांवर चर्चा झाली होती. या चर्चेच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाने समिती गठित केली आहे.

या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करण्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासन आणि इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या डायनॅमिक अॅश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन (डीएसीपी) योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत. याशिवाय, गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कल्याण निधी योजना तयार करण्याच्या दृष्टीने तिची रचना, कार्यकक्षा, आर्थिक तरतूद, लाभांचे स्वरूप आणि अंमलबजावणीची पद्धत यांचा सविस्तर अभ्यास समिती करणार आहे.या समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट-अ (मॅग्मो) यांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


 Give Feedback



 जाहिराती