उमेश कुगावकर
भाग २६ पासून पुढे
उत्तराखंडाच्या सरकारी बाबू लोकांनी मला हॉटेल जवळ सोडलं आणि ते निघून गेले.. आमची सर्व व्यवस्था करा अशी वरून ऑर्डर सुद्धा दिली. मग मी माझी आवडती मॅगी मागवली.. तेथेसुद्धा बरेचशे पहाडी लोक स्वस्त आहे म्हणून मॅगी घेत होते. पहाडी लोक विडी पिण्यात भलतेच पटाईत होते. सिगारेट पिणे खूपच " शाईन मारणे " शिवाय त्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते
एक रुपयाची वेडी तेथे दोन किंवा तीन रुपयाला मिळत होती. तेसुद्धा त्यांना परवडत नव्हते..
आता आम्ही "रानी चट्टी " येथेच राहणार होतो.. एकदम छोटस गाव होतं पण अतिशय सुंदर..

ब्रेकफास्ट आणि चहा झाल्यानंतर मी चांगला व्हिडिओ, view मिळेल म्हणून थोडी पायपीट केली.. समाधान झाले.. आणि समोरचा नजारा पाहून "दिल खुश हो गया "
आज पर्यंतच्या प्रवासात प्रथमच बर्फाच्छादित शिखर पहायला मिळाली... त्यामुळे मजा आली.. त्यातून एका पहाडी माणसाने सांगितलं, " इस पहाड के नीचे यमुनोत्री है "

मग तर मी अतिशय आनंदी झालो... त्याच्या हातावर गोड-धोड खायला ठेवले.. तो हसत हसत निघून गेला...
अचानक एक पहाडी माणूस भेटला.. सात-आठ किलोमीटर चालून तो रेशन कार्डची झेरॉक्स काढण्यासाठी इथे आला होता.. एवढ करून सुद्धा इथं light नव्हती... केव्हा येईल याचा भरोसा नव्हता.. मग आम्ही दोघांनी चहा घेतला त्याच्या हातावर थोडे पैसे ठेवले" कुछ खा के लोगो " असंही बोललो. तेवढाच टाईमपास झाला.. आणि मग दुपारी दोन वाजता आमची जोडी आली... आम्ही जवळच एका हॉटेलात जेवलो... आणि परत आमच्या हॉटेलवर जात असताना तोच
पहाडी माणूस भेटला..झेरोक्स चें काम फत्ते झाले होते.. हे त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होते.. मी त्याची ओळख करून दिली.. आपल्या शहरात आपण झेरॉक्स काढताना पाच मिनिटे सुद्धा "दम" धरू शकत नाही आणि इथे मात्र भयंकर हाल-अपेष्टा पहाडी लोक सहन करतात याची खंत वाटली
सकाळपासून देवधर बाई आणि मोहन केळकर यांनी 25 किं. मीं.
चं अंतर कापण्याचा विक्रमच केला होता.. त्यामुळे दोघेही खूष होते..
राना चट्टी...
तरीही आम्ही चालत सुटलो.. वेडीवाकडी, थोडस चढणं असलला रस्ता लांब दिसत होता.
तरीही आम्ही नेटाने चाललो होतो. पण प्रत्यक्षात जेव्हा तिथपर्यंत पोहोचलो आणि चालू लागलो तेव्हा आमची चांगलीच दमछाक झाली. शेवटी कसेतरी ती चढाई आम्ही पार केली.. तिथं एक लहानसं मंदिर होतं आणि शिवम नावाचा धाबा.. दोन, तीन ट्रक्स सुद्धा उभे होते.. आम्ही नाष्टा, चहा घेतला थोडा आराम केला. आम्ही फ्रेश झालो.

' उनियल ' आमच्या पुढील मुक्कामाचं गाव होत. परत एकदा मी शरणागति पत्तकरली.. एका ट्रक ड्रायव्हरला सोडतोस का म्हणून विचारलं.. अगदी तरणाबांड मुलगा होता.. पण भलामोठा ट्रक चालवत होता. मला वाटतं ड्रायव्हिंग करायला शारीरिक बळा खंबीर मानसिक बळ ची जास्त गरज असावी लागते. तोपर्यंत आमची जोडी पुढे चालु लागली. मग ड्रायव्हरनें नाष्टा केला.. गाडी साफ केली, पुढची काच पाण्याने धुतली.. आत मध्ये शंकर, हनुमान यांचे फोटो होते उदबत्ती लावली नमस्कार केला, मी सुद्धा केला आणि देवाचे नाव घेऊन गाडी स्टार्ट केली. आणि माझा सुहाना सफर सुरू झाला. नदीच पात्र खूपच वीस्तीर्ण होत. पाहून बर वाटल. पण पाणी मात्र नव्हतं. कोरडी ठणठणीत नदी होती..
क्रमशः
