सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

पुणे क्राईम ब्रँच पोलिसांची कारवाई : सांगली जिल्हयातील कुपवाड एमआयडीसी मध्ये तीनशे कोटी रुपयाच्या एमडी ड्रग्स जप्त ; तीन जणांना अटक

विश्वजित भालेराव ( प्रतिनिधी )    22-02-2024 10:15:46

सांगली : जिल्हयातील कुपवाड एमआयडीसी मध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. आयुब मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कुपवाड एमआयडीसी मध्ये केटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्सवर कारवाई झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

पुणे क्राईम ब्रँचने अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या अमली पदार्थ एमडी ड्रग्सचा पर्दाफाश केला असून पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एमआयडीसी कुपवाड मध्ये काही ३०० कोटी रुपयांचा एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे. पुण्यातून टेम्पो मधून काही पिशव्या कुपवाड मध्ये आल्याचे माहिती पुणे अनिव्हेशन विभागाला मिळाली. आरोपी आयुब माकनदार याने कुपवाडमध्ये रूम भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या. सांगलीतील कुपवाड मधून १४० किमो एमडी ड्रग्स  जप्त कण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २८० ते ३०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पुणे शहर, शिरूर, दिल्ली त्यानंतर कुपवाड मध्ये पुणे क्राईम ब्रँचची कारवाई करण्यात आली आहे. 

आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडा मध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयीता सोबत ओळख झाली. त्यातूनच तो ड्रग्ज  पुरवठा करण्याचे काम करत होता. कुपवाड मधील स्वामी मळामध्ये पुण्यातील क्राईम ब्रँच कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपवाड येथे येवून कारवाई केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम आय डी सी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती