सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

वेतनपट आकडेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत जानेवारी 2024 या महिन्यात 16.02 लाख सदस्यांची वाढ

डिजिटल पुणे    25-03-2024 10:50:10

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मधील सदस्यांची तात्पुरती  वेतन पट आकडेवारी 24 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली.  जानेवारी 2024 मध्येईपीएफओ मध्ये 16.02 लाख सदस्य झाल्याचेया आकडेवारीत अधोरेखित करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यातसुमारे 8.08 लाख नव्या सदस्यांची नोंदणी झाली असल्याचेही या आकडेवारीत निर्दशनात आले आहे. या आकडेवारीतील आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजेत्यात 18 ते 25 या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहेजानेवारी महिन्यात नव्याने नोंदणी केलेल्या एकूण सदस्यांमधे 56.41% संख्या या तरुणांची आहे. ज्यावरूनसंघटित क्षेत्रात रोजगार मिळवणारेबहुतांश सदस्य युवा आहेतत्यातील बहुतेक पहिल्यांदाच नोकरी मिळवलेले आहेतअसेही निदर्शनास आले आहे.

सुमारे 12.17 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे. याचा अर्थ,  या सदस्यांनी त्यांची नोकरी बदलली आणि त्यानंतरईपीएफओच्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले. शिवाय भविष्य निर्वाह खाते बंद करण्यासाठी अर्ज करण्याऐवजी त्यांची जमा रक्कम दुसऱ्या कंपनीत हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडत त्यांनी दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा विचार केला.

वेतनपट आकडेवारीच्या स्त्री-पुरुषनिहाय  विश्लेषणातून असे दिसून आले आहे की 8.08 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.05 लाख महिला सदस्य आहेत. तसेचया महिन्यात एकूण महिला सदस्यांची संख्या सुमारे 3.03 लाख इतकी होती. महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढही श्रमशक्ती अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण झाल्याचे लक्षण आहे.

उद्योगनिहाय आकडेवारीची मासिक तुलनात्मक आकडेवारीसंगणक वापररुग्णालये अशा तसेच उत्पादन आणि विपणन सेवा क्षेत्रातील कंपन्यावित्तपुरवठा करणाऱ्या संस्था इत्यादी उद्योगांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची वाढ दर्शवते. एकूण निव्वळ सदस्यत्वापैकी सुमारे 40.71% वाढ ही तज्ज्ञ सेवा क्षेत्रांमधली आहे. (यातमनुष्यबळ पुरवठादारकंत्राटदारसुरक्षा सेवाइतर कामे इत्यादींचा समावेश आहे.) 

ही वेतनपट आकडेवारी तात्पुरत्या स्वरूपाची आहेकारण आकडेवारी संकलनही सतत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. कर्मचारी नोंदणी सतत सुरू असल्यानेया आकडेवारीत बदल होत असतो. त्यामुळे आधीची आकडेवारी दर महिन्यात अद्ययावत होत असते. एप्रिल 2018 पासून ईपीएफओसप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीसाठी वेतनपट आकडेवारी जाहीर करत आहे. मासिक पेरोल डेटामध्येआधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) च्या माध्यमातूनप्रथमच ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्या सदस्यांची संख्याईपीएफओच्या मधून पडणारे विद्यमान सदस्य आणि ईपीएफओ नोंदणीतून बाहेर पडूनपुन्हा एकदा  सामील झालेले सदस्यअशी दोन्ही आकडेवारी मिळवूनत्या आधारे,  निव्वळ मासिक पेरोल साठीची संख्या निश्चित केली जाते.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती