सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

त्रिस्थळी म्हणजेच प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसीला जायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी

पुजा    25-04-2024 14:20:42

पुणे : भारतीय पर्यटन विकास को. ऑप सोसायटी तर्फे, रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांना अयोध्येत जाता यावे याकरिता, महाराष्ट्रातुन रेल्वे सोडण्यात येणार आहे. या सर्व यात्रा त्रिस्थळी म्हणजेच प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी करिता असतील. या सर्व रेल्वे यात्रा २२ जुलै २०२४  ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे. पहिली यात्रा : २२ जुलै २०२४ आणि दुसरी यात्रा : १० ऑगस्ट २०२४ असणार आहे. या यात्रेत थांबे हे खडकी, चिंचवड, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड येथे असणार आहे. पुण्यातून पहिल्या २ रेल्वेगाड्या २२ जुलै आणि १० ऑगस्ट रोजी अयोध्या वाराणसी प्रयागराज साठी रवाना होईल. एका यात्रे मध्ये फक्त ११५२ प्रवाशी संख्या राहतील. या यात्रेचे ग्रुप बुकिंगसाठी किमान २० प्रवाशांचा समावेश आवश्यक आहे.

२०२४ मध्ये यात्रा प्रवासास निघण्याच्या तारखा २२ जुलै,  १० ऑगस्ट, २१ सप्टेबर, १३ ऑक्टोबर, ०२ नोव्हेंबर, १५ नोव्हेंबर, ०८ डिसेंबर, २० डिसेंबरमध्ये आयोध्या, वाराणसी, प्रयागराज 

या यात्रेमधील सुविधा व काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे : 

1) ११५२ प्रवाश्यांना कन्फर्म बूकिंग

2) ३ ए सी कोच मध्ये बूकिंग

3) रेल्वेमध्ये दिलेले बेडिंग घरी घेऊन जाता येणार आहे

4) पुणे ते पुणे रेल्वे प्रवास.

5) अयोध्या वाराणसी प्रयागराज येथे स्थळ दर्शनासाठी बसेसची व्यवस्था.

6) एक दिवस एअरकंडिशन रूम मध्ये डबल शेअरिंग राहण्याची सोय

7) सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे/रात्रीच्या जेवणाची सोय. शुद्ध शाकाहारी भोजन

8) खडकी, चिंचवड, लोणावळा, कल्याण, नासिक, जळगाव येथे पिक अप पॉइंट

या यात्रेत प्रत्येक प्रवासी खर्च ३ ए सी रु. २३६००/- फक्त (सर्व समाविष्ठ रेल्वे तिकीट, जेवण, हॉटेल वास्तव्य, निवडक प्रेक्षणीय स्थळे)  + GST Extra या यात्रेची बुकिंग्स सुरु झालेली आहेत. किंवा श्री प्रविण घोरपडे ९५०३०५७१०४,  श्री संतोष माने ९८२२९१११८५, श्री हर्षद खोंडे  ९६५७००००८७, श्री आशिष हिंगमिरे ९८२३३ ३३३९८ यांना संपर्क करावा.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती