सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची, वाईतील सौ वैशाली गजानन घाडगे; यांनी सांगितलं त्याचा वैवाहिक जीवनातील २३ वर्षाचा सुखकारक प्रवास

डिजिटल पुणे    18-04-2024 11:52:39

"शादी के लड्डू जो खाये वो ही पचताये  औरु जो नहीं खाये वो भी पचताये ।" असे असते आपल्या भारतीय संस्कृतीत १६ संस्कारापैकी लग्न हा एक मंगलमय सोहळा खुप छान तो दिवस असतो. नवरदेव हा नवरीसाठी  आलेला असतो तर नवरी पण नवरदेवासादी आलेली असते. लग्नाची तयारी दोन-तीन महिना आधीचा सुरू झालेली असतः सगळीकडे आनंदमय  वातावरण असते. हे सगळे मला अनुभवयालाच मिळाले, कारण माझे लव्ह मार्राज आहे जी लग्नाची घरातील लोकांची धांदल, ही अनुभवयालाच नाही  आमचे लग्न हे खूप tension मध्ये झाले: Intercast  marriage, माझ्या family membeer  त्याला सहमत नव्हते ।. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आमचे लग्न १९ सप्टेंबर २००१ ला झाले छान तो दिवस होता.  आळंदीमध्ये  संत ज्ञानेश्वर माऊलींची आशिर्वाद घेऊन आम्ही नविन जीवनाला सुरुवात केली. मी स्वतः एक शिक्षिका आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना काय होणार पुढे हयाचा अंदाज होता माझ्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली तरी माझे आई वडील माझ्याशी अजून बोलत नाहीत. असे लग्न झाले की आईवडिलांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले.

 असे लग्न केल्याने आपल्याला  त्या मुलाचा स्वभाव थोडा समजला असतो .  परंतु जेव्हा आपण त्यांच्याबरोबर २४ तास राहतो तेव्हा समजतो तो कसा आहे. माझे लग्न झाले ते दिव खूप चांगले होते नंतर हळू हळू माझे संसारिक आयुष्य सुरू झाल. मी एक गोड बातमी दिली. परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होत. मला दोन बाळांची आई होण्याचा मान मिळाला, परंतु हा मान जास्त दिवस राहिला नाही , मला साडे सात महिने झाले आणि मला त्रास झाला यामध्ये मी माझी दोन बाळ गमावली. त्यावेळी माझ्या सासूबाईनी व माझ्या मिस्टरांनी माझी खूप काळजी घेतली.

असे लग्न केल्याने समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो यामध्ये अॅडजस्टमेंट महत्वाची असते दोघांनीही एकमेकांना समजवून घ्याय‌चे असत माझ लग्न झाले, त्यावेळी मला स्वयंपाकातले काहीही करायला येत नव्हते पण हळूहळू मी स्वयंपाक करायला शिकाले येथे त्यांनी घराती  मंडळीनी समजवून घेतले. परंतु अरेंज मॅरेंज असते तर आई- वडिलांना दोष दिला असता, आईने काही शिकवले आहे का? सांगायचे झाले तर मी B. ED लग्न झाल्यानंतर केले MA सुद्धा केले, त्यामध्ये मला माझ्या घरातील सर्वांचे सहकार्य लाभले मला teaching ची खूप आवड आहे. हे ज्ञानदानाचे कार्य  मी शेवटपर्यंत करणार आहे. माझ्या आईचे स्वप्न होते की मी  छान शिक्षिका, बनावे. आता मी बनले आहे . परंतु हे पाहण्यासाठी माझी आई या जगात नाही. ती २०११ ला मला एकटीला सोडून गेली. परंतु तिचे आर्शिवादा कायम माझ्या बरोबर असतात. व ती सुद्धा कायम माझ्या वाईट चांगल्या कामात माझ्या बरोबर असते

 लग्नाबद्दल सांगायचे झाले तर माझे लग्न कमी खर्चात झाले . तसेच वऱ्हाडी मंडळी, तर मोजकी होती परंतु सर्व विधी छान झाले. परंतु त्यात महत्त्वाचे म्हणजे आई-वडिलांचे आर्शिवाद नाही मिळाले ह्याचे खूप दुःख आहे . आता २०२३ ला मैत्रिणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो होतो आदेश बांदेकर यांचा  झी मराठी वाहिनीवर कार्यक्रम असतो.  त्यामध्ये पण मी सर्वांची माफी मागितली परंतु माझे वडिल वा भाझी भावंडे आजही माझ्याशी बोलत नाहीत.

लग्न विधी हा खूप चांगला सोहळा आहे त्याचे पावित्र्य आपण राख‌ले पाहिजे आणि त्याची मजा आपण घेतली पाहिजे. Adjustment ही खूप  महत्त्वाची असते. संसार चालवत असताना नाहीतर संसार सुरळीत चालत नाहीः मी खूप कष्ट केले आहेत संसारामध्ये, मी स्वत, English medium school मध्ये teaching करून नंतर घरी tution  घेत होते.आज मी छान सेटल आहे. माझा मुलगा त्याचे नाव  स्पंदन आहे त्याचे तो ही छान शिक्षण घेत आहे.  आमचा संसार सुखाचा सुरु  आहे. खूप काही लिहावस वाटत आहे परंतु मर्यादा असतात. अशा पद्‌धतीने आमचे लग्न झाले. आज माझ्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण झाली. अशी ही गोष्ट आमच्या लग्नाची आहे. 

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती