सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची; पुण्यातील माधुरी स्वामी यांनी सांगितलं लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सोहळा

डिजिटल पुणे    19-04-2024 18:16:17

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सोहळा. लग्न म्हणजे आयुष्याच्या वळणावर भेटलेले साथीदार. अश्याच एका लग्न सोहळ्याची गोष्ट म्हणजे 'आमच्या लग्नाची'

ही गोष्ट आहे एका अश्या मुलीची जी एकत्र कुटुंबात वाढली. जिथे सक्खे -चुलत असा काही भेद नाही. मी जी आईला सोडून कधी कुठे गेलीच नाही. आम्हा तीन भावंडात मोठा भाऊ, मोठी बहिण आणि सगळ्यात लहान मी. मोठ्या बहिणीच लग्न झालं आणि काय मग. सगळीकडे माझ्याच लग्नाचा विषय. इकडचे पाहूणे - तिकडचे पाहूणे आणि कांदेपोह्याचा कार्यक्रम. बहिणी - भावांचं ते चिडवण "काय गं कसा मुलगा हवा आहेत "पुण्याचा हवा की मुंबईचा। अश्या साऱ्या प्रश्नांचा वर्षाव व्हायचा, खरं मी तर काही बोलायचीच नाही.

खरं तर मी असं काही ठरवलेलं नव्हतं किंवा तेव्हा मला असं काही कळतही नव्हतं. मुळातच मध्यम कुटुंबात वाढल्यामुळे माझ्या काही फार अपेक्षा ही नव्हत्या. त्यामुळे हा निर्णय मी पूर्णपणे माझ्या आई-वडिलांवर सोपवला होता. हो.... पण एक गोष्ट मनात सारखी यायची की, मिळणार सासर हे 'लातूर'च असावं म्हणजेच माझ जे माहेर आहे ते. 

 

काय करणार मायेचा पाष तुटत नाही ना. असं सगळं चालू असताना किमान सात-आठ स्थळ पाहून झाली आणि त्यातही तीन चार स्थल इंजिनिअर मुलांचीच आणि तेही  फार  लांब गावाची ते ऐकूनच नको वाटायचं, मुलगा पसंत आहे का, हा विचारच  यायचा नाही मनात एके दिवशी रात्री अचानक आमच्या शेजारचे काका चालले आणि म्हणाले की, " आमच्या ऑफीस मधील माझे सहकारी आहेत, त्यांचा मुलगा आहे लग्नाचा, ते ही स्थळ पाहताहेत त्यांच्या मुलासाठी, मुलगा 10 गाडीने  च्या पुण्याला निघणार आहे. ते थोड्या वेळात  येतील मुलीला पाहायला.

असं म्हटल्यावर सगळ्यांची एकच गडबड उडाली आणि मी तर सगळ्यांची चापून चोपून केसांना तेल लावून वेणी घालून बसलेली, आता कायें.... केस धुवायला ही वेळ नाही मिळाला. मी तशीच वेणी  घालून, साडी नेसून व्हायचं तयार, म्हणून कसतरी तयार झाली. आणि माडीवर जाऊन थांबले, 'कोण मुलगा आहे .एवढ्या घाईत येणार आहे. हे  पाहायचं होतं. त्यासाठी माडी सारखी  जागा सापडणार नाही. कारण रात्र होती आणि त्यांना येताना सहज पाहू शकले असते. एवढ्यात मला कळलं की, मुलगा इंजिनिअर ओहे. मी, काकांना म्हटलं की, "काका हे स्थळ काही मग जुळूणार नाही!

आधिचा अनुभव पाह‌ता याला दोन कारणं होती. एक तर मुलगा असणार इंजिनिअर आहे, तर त्याला इंजिनिअर मुलगीच हवी आणि माझं M.com. झालेलं. किंवा ते नसेल तर भरपूर हुंडा नक्कीच मागणार आणि त्याला माझा विरोध होता. नंतर कांदे-पोह्यांचा नाही पण चहा पाण्याचा कार्यक्रम आटोपला. 

दोन महिन्यांनी गौरी-गणपतीचा सण आला. सणा- सुदीची आवड असल्यामुळे त्यात गणपती येणार म्हंटल्यावर अग‌दी उत्साह संचारतो माझ्यात छान डेकोरेशन करणे, नैवेद्याचे मोदक, आरती या सगळ्यांची खूप आवड त्या दिवशी गणपतीची आरती झाली आणि नुकतच आम्ही गप्पा मारत बसलो आणि कोणाचा फोन होता माहिती का ?  त्याच इंजिनिअर मुलाचा ज्याच्या वेळेस कांद्या-पोह्यांचा कार्यक्रम चहा-पाण्यावर आटोपला.होतं 'सदानंद: घरच्यांच्या संमतीनेच त्यांनी फोन केला आणि म्हणाले की 'मला माधुरीला बोलायच आहे आईने मला फोन दिला. काय बोलावं कसं बोलाव मनात खूप संभ्रम निर्माण झाला. बहुतेक त्यांनी माझ्या मनाची झालेली घालमेल ओळखली असावी, त्यांनीच बोलायला सुरुवात केली आणि फोनवरच थोडीफार ओळख झाली आणि आमचं बोलणं संपलं. मी फोन ठेवला. दोन दिवस आमचं बोलणं झालं.

थोड्या दिवसांनी त्यांनी होकार कळवला. खरं तर मी फार गोंधळले होते की, मुलगा इंजिनिअर आहे तरीही त्याने इंजिनिअर मुलगी का पसंत नाही केली.

दिवाळी दोन दिवसांवर होती होती आणि त्यांच्याकडून घरच्यांना बोलावणं आलं की, आपण कच्ची बैठक करून घेऊ आपल्यात बोलून ठरवू आणि नंतर सर्व नातेवाईकांसोबत साखर खाऊ. माझे आई वडिल, दादा आणि काका असे चौघेजण त्यांच्याकडे गेले. 'आम्हाला हुंडा नको फक्त मुलगी हवी.. असं त्यांनी सांगितलं. दोन्ही कुटुंबातील सदस्य खूप आनंदात होते आणि साखर खाण्याची तारीख पक्की केली. त्या सगळ्यांत एक गोष्ट सांगायची राहून गेली. ती म्हणजे जेव्हा सदानंद चा पहिल्यांदा फोन आला- तेव्हा ते शेवटी म्हणाले की आपण रोज थोड बोलू शकतो? तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की, 'आपलं ठरेल की नाही माहित नाही असं बोलणं बरोबर आहे का? असं म्हणून मी विषय टाळला.

२० डिसेंबर 2015 साखर खायचा कार्यक्रम अगदी थाटामाटात दिवस पार पडला . लग्नाची तारीख पक्की झाली २४ एप्रिल 2016. कार्यक्रम झाला आणि सदानंद मला काय म्हणाले माहितेय ... माधुरी  आता आपण बोलू शकतो ना? हे त्यांचं बोलणं , हृदयाला स्पर्शन गेलं. फक्त दीड महिना राहिला होता. 

लग्नाला आता ताईची डिलीवरी झाली पाण्याचा दुष्काळ, उन्हाळ्याचे दिवस आणि अचानक आजीची तब्येत बिघडली पॅरालिसीस झाल्यामुळे दीड वर्षापासून ती अंथरुणातच माझा फार जीव त्यामुळे तिची सगळी सेवा मीच करायची.आजी वारली अगदी लग्नाच्या दीड महिना आधी. तिचे शेवटचे शब्द आजही आठवतात . 'तुज लग्न व्हायच्या आधी मला मरण यावं नाहीतर माझं कसं होणार आणि तसंच झालं. खरंतर हे तिचेच आशीर्वाद मला लाभले म्हणून सदानंद सारखा पती मला जीवनसाथी म्हणून लाभला, अरे.. अरे ... थांबा एव्हढ्यात कुठे आता तर खरा गडबड गोंधळ आहे म्हणजे काय.... मंगल कार्यालय बुक केलं, आचारी फायनल केला, पत्रिका सॅम्पल रेडी होत आणि तेव्हाच गडबड अशी झाली की २४ एप्रिल 2016 त्या दिवशी तर मुहूर्तच नव्हता.. आता काय करायचं. कारण मुहूर्त काढताना त्यांनी चुकून 2015 पंचांग पाहिलं होतं, परत दोन्ही कडचे मंडली जमले आणि 23 तारखेचा मुहूर्त मिळाला तोही सकाळचा 8.34 चा आता कस करायचे शेवटी एक विचार निश्चित ठरला की २३ तारखेला घरी देवासमोर लग्न लावायचं आणि बाकीचे विधी मंगल कार्यालयामध्ये परत एकदा सर्वांसमोर करायचं 23 एप्रिल 2016 ही तारीख काढली आणि बाकी बुकींच मॅनेज केल.

 सगळ काय मग मंडळी 'सदानंद - माधुरी' च्या लग्नाला यायचं हं !

हा बैंड बाजा वरात वरात घोडा 

घेऊन या नवरोजी

लगीन घटीका समीप आली 

करा हो लगीन घाई.. 

ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते त्याची प्रतिक्षा संपली २३ एप्रिल २०१६ ला  ९३ कुलदेवतांच्या साक्षीने, त्यांच्या आशिवादाने आम्ही विवाह बंधनात अडकलो. साता जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या आणि एक नवीन प्रवास सुरु झाला. शेवटी एवढचं म्हणावसं वाटतं की

गोष्ट लिहिताना लग्नाची

 मन अगदी भरून आलं...

 हृद्य पानावरती उतरवताना 

प्रत्येक क्षण जगता आलं..

 वीरमोहश्वर संस्थान ने दिली संधी 

लग्न सोहळा परत अनुभवण्याची...

 कुलदेवतेचे मानते आभार 

सदैव आनंद दिलाय मला

 सदानंद च्या रूपात... 

सदानंद च्या रूपात...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती