सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची, सौ. साक्षी जंगम यांनी सांगितल्या लग्नाच्या गोड आठवणी; चला तर मग त्या गोड अशा आठवणींमध्ये फेरफटका मारूया

डिजिटल पुणे    24-04-2024 17:40:03

सर्वप्रथम भी वीरमाहेश्वर जंगम संस्था पुणे यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अशा सुंदर अशा विषयावर निबंध लिहिण्याची व व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप आभार मानते. चला तर मग त्या गोड अशा आठवणींमध्ये फेरफटका मारूया.

या विषयाला सुरवातच आमच्या दोघांच्याही आई वडिलांच्या लग्न पासून होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आमच्या आई वडीलांपासून कसे ? तर माझ्या सासूबाईचे माहेर हे महाड येथील. परंतु दि. 07 मार्च 1994 रोजी माझ्या सासूबाईचे लग्न हे  आंबेत स्थित मूळचे नांदवी येथील प्रकाश स्वामी (औदार्य भावकी) यांच्याशी झाले. या नंतर काहीच वर्षात माझ्या सासूबाईना ज्या घरामध्ये दिल होत तिथूच माझ्या आई चे (औदार्य भावकी) महाड येथील श्री रणजीत स्वामी (ओझरेकर) यांच्याशी लग्न झाले. थोडक्यात माझ्या सासूबाई महाड मधून आंबेत स्थित व मूळ नांदावी मध्ये आल्या त्या नंतर माझ्या आईचे नांदवी येथून पुन्हा महाड येथे लग्न झाले. एवढे सर्व गोष्टी मध्ये एक गोष्ट अशी घडली कि केव्हाही नवीन दाम्पत्याचे विवाह झाल्यानंतर दार अडवण्याची पद्धत असते, ती प्रथा माझ्याच योगायोगाने सासूबाईनी चालवली व माझ्‌या आई वडिलांच्या विवाहवेळी दार अडवून तुझी मुलगी माझ्या मुलाला देणार का अशा प्रकारची प्रथा पूर्णत्वास गेली. परंतु कोणास ठाऊक होते की माझ्या सासूबाईनी घेतलेले वचन आणि माझ्या आईने दिलेले वचन हे पूर्णत्वास जाईल. या सर्व काही गोष्टी योगा योगा ने घडत गेल्या. या सर्व गोष्टी जुळवून आणण्याचे काम अजित कुमार विश्वास जंगम (उर्फ आण्णा) यांनी केले. आण्णांचे आभार मानावे तितके कमीच आहे. या नंतर दिनांक २२ नोव्हेंबर २०२० दोन्ही कडील कुटुंब यांच्या समवेत लग्न ठरले. तो सोहळा आमच्या साठी एक आनंददायी व आयुष्यामध्ये नवीन वळण घेऊन येणारा होता. इतके वर्ष मनमोकळे राह‌णारे एकट्‌या विचारात राहणारे आमची जबाबदारी वाढली होती. एकमेकांची काळजी जिव्हाळा वाढला होता. आई पप्पांच्या चेहऱ्यावर आनंद देखील खूप होता. आई पप्पांनी त्यांच्या लग्नामध्ये दिलेला शब्द माझ्या पप्पांनी खऱ्या अर्थाने पुर्ण केला होता. त्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसतच होते. किती भाग्यवान आहे मी माझे माहेरचे जीव व जिवापलिकडे जपणारी माझी आई आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे माझे पप्पा आणि खूप काळजी घेणारा माझा लहान भाऊ हे माझ्यासाठी काय आहेत हे शब्दात नाही व्यक्त करू शकत आणि आमचं राजमोहन निवासातील कुटुंब न व्यक्त होणारी भावनाच......

 खरंच मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असेल की मी या माय बापाच्या पोटी जन्म घेतला आणि काही कर्म चांगले केले असतील म्हणून मला सासरी प्रेमळ मायाळू लोकांचे मिळालं. माझी प्रेमळ सासू आदरणीय सासरे आणि प्रेम माया काळजीचा पूर्ण भांडार म्हणजे माझ्या हक्काचा माणूस माझा प्रेमळ नवरा...

22 नोव्हेंबर 2020 ला लग्न जमले आणि हक्काच्या माणसासोबत आयुष्याची नवी सुरुवात चालू झाली. बघता बघता दिवस सरले आणि लग्नाचा तो मंगलमय दिवसाला चार दिवस सलग कार्यक्रम चालूच होते. पाहुण्यांची लगबग, हळद, उठणे, देवकार्य, नाच गाणी नुसती मज्जाच मज्जा... लग्नाच्या आदल्या दिवशी मोठ्या जल्लोषात डान्स वेगवेगळ्या गाण्यांवर झाले. आणि शेवटी तो लग्नाचा दिवस आलाच.

दिनांक 27 डिसेंबर 2021 पहाटे लवकर उठून आवरून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या नियोजित ठिकाणी हॉलवर निघण्याची नयारी झाली. कुटुंबातील सर्वजण येऊन भेटत होते किती म्हटले तरी सुद्धा सर्वांना अश्रू अनावर होत होते कारण त्यांची लाडकी साक्षी ही आता महाडच्या कुटुंबातून गोरेगाव शिवकल्याण कुटुंबामध्ये जाणार होती. या गोष्टीचे आनंद तर होतेच पण शेवटी इतकी वर्ष ज्यांच्या सहवासात होते त्यांच्यापासून दूर जाणे कठीणच ना..! सर्व आवरावर झाल्यानंतर आईलाही अश्रू अनावर झाले तसेच पप्पांना सुद्धा.. हे सर्व  पाहून मलाही अश्रू येत होते परंतु हसत अश्रू लपवत होते. उंबरठा मधून बाहेर पडताना सुयोग ने माझे पाय धुतले आणि त्यालाही अश्रू` झाले शेवटी माझ्याही अश्रूचा बांध फुटला. माझ्या राजमोहन निवासाला पाहिले आणि गाडीत बसले गाडी निघाली ते थेट माणगावला. वाटेत ठिकठिकाणी पप्पा देवी देवतांच्या नावाने श्रीफळ वाढवत होते गाडी थेट तळेगाव याच्यापुढे एका मंदिराजवळ थांबली त्याच ठिकाणी अहोंची सुद्धा गाडी थांबली होती. थोड्‌यावेळाने दोघांच्याही गाड्‌या गांधी मेमोरियल हॉल या ठिकाणी पोहोचल्या. हळूहळू लग्नाची वेळ ही येत होती दोघेही आप आपल्या रुममध्ये तयारीसाठी गेलो, यानंतर आम्हाला थोड्‌याच वेळात मुहूर्ताची वेळ आल्यावर स्टेज वरती बोलवण्यात आले. थोड्‌याच वेळात मंगलाष्टकांना सुरुवात झाली

"शुभमंगल शिवकल्याण"

हे शब्द कानी पडताच पापण्या औलावल्या. माझा हात माझ्या नवर्याच्या हातात होता तो मी गच्च धरला आणि त्यांना ही या स्पर्शातून जाणीव झाली की माझ्या मनात काय विचार चालू आहे त्यांनी पण गच्च हात धरला त्या स्पर्शातून अबोल भाषेमधून एक जाणीव झाली "घाबरू नकोस मी नेहमीच तुझ्या सोबत आहे". आमच्या विवाहप्रसंगी महाराष्ट्र मधून विविध ठिकाणाहून अनेक महाराजांची उपस्थिती होती, त्यांच्या सानिध्यामध्ये आमचे विवाह पार पडले. सर्व शिवाचार्याचे गुरुजनांचे आशीर्वाद घेतले व आमच्या या सुखी संसाराला प्रारंभ झाला. विवाह थाटामाटात पार पडला आता वेळ आली होती ती पाठवणीची. त्या पाठवणी मध्ये मी सगळ्यांच्या भावना म्हणजेच एवढेच लिहू इच्छिते की,

दाटूनी कंठ येती

दाटूनी कंठ येतो

ओठांत येई गाणे

जा आपल्या घरी तू,

जा लाडके सुखाने

दाटून कंठ येतो

काही क्षणानंतर माझ्या अहोच्या घरी पुष्पवृष्टी ने आमचे स्वागत झालं माप ओलांडून गृहप्रवेश झालं. नंतर सून मुख पाहण्याचा कार्यक्रम झाला. बाईनी सौभाग्याचा अलंकार परिधान केलं की वेगळीच चमक तिच्या चेहऱ्यावर दिसून येते ते मला माझा चेहरा आरशात पाहिल्यावर जाणवलं. अशा प्रकारे लग्नाचा तो मंगलमय दिवस पार पडला.

संसार चालू झाला संसाराची गाडी छान चालू झाली फिरणे एकमेकांना समजून घेणे विश्वास काळजी प्रेम माया सगळ्यांचं मन जपणे वैगवेगळ्या जबाबदारी या सगळ्या गोष्टींमध्ये मी रमून गेले सगळ्या चांगल्या गोष्टी घडत होत्या. अशा या आमच्या सुंदर संसारात खूप छान दिवस गेले. योगायोगाने 2022 मध्ये नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला माणगाव येथे नवचंडी याग "ओम श्री पंचाक्षर माहेश्वर मंडळ महाराष्ट्र" यांच्या विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमांमध्ये आम्हाला मुख्य दांपत्य म्हणून सन्मान मिळाला. आणि असेच अशाच या नवचंडी देवी चे आशीर्वाद घेऊन आम्हाला गोड बातमी कळाली. घरामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. घरातील सर्वांनी डोहाळे पुरवले. आणि असेच पाहता पाहता सातव्या महिन्यामध्ये धुमधडाक्यामध्ये ओटी भरण डोहाळे जेवण कार्यक्रम पार पडले. त्यानंतर लगेचच आठव्या महिन्यामध्ये आपल्या वीरशैव लिंगायत धर्मशैली पद्धती ने गर्भ दीक्षा संस्कार पार पडले. या सर्व नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये मनोमन दुर्गा सप्तशती पाठ करण्याची तीव्र इच्छा झाली आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ हे अविरत नऊ महिने वाचन करत राहिले. पाहता पाहता नववा महिना सुरु झाला आणि योगायोग म्हणजे आई-बाबा म्हणजेच माझे सासू-सासरे हे केदारनाथ उत्तराखंड येथे माहेश्वर मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने अभिषेकास गेले होते. तिकडे केदारनाथ शिवलिंगावर अभिषेक झाले आणि इकडे आमच्या घरी केदारनाथांचे आगमन झाले. ही गोड बातमी अहोंनी आई बाबांना सांगितले. त्यांचीही केदारनाथ यात्रा सफल झाल्याचे आनंद गगनात मावत नव्हते आणि आम्हाला केदारनाथ भगवंताऱ्या आशीर्वाद व दुर्गा सप्तशती पाठाचा प्रसाद लाभला. केदारनाथ भगवानास दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन केव्हा त्यांच्या या लहानशा केदारनाथाचे दर्शन घेतोय असे आजी आजोबांना झाले होते. आजी आजोबांचा केदारनाथ सर्वज्ञ आज सात महिने पूर्ण झाला आहे हे गोड क्षण आठवणी सगळ्या साठवून ठेवण्यासारख्याच आहेत शिवकल्याण परिवारावर शिवशंभु ची कृपादृष्टी खूप आहे म्हणूनच गोष्ट आमच्या लग्नाची पासून आत्तापर्यंतचा प्रवास हा सुंदर आणि चांगल्याच गोष्टी घडून होत आहे.

 

देवाचे कृपा म्हणून आतापर्यंत चांगलंच घडत आहे वाईट गोष्टी कुठलीच नाही अशीच श्री शिवशंभु केदारनाथ भगवानाची कृपा आमच्या बरावर राहो हीच प्रार्थना..

 

गोष्टी आठवणी लिहिताना पुन्हा त्या आठवणी मी जगले म्हणूनच मी वीर माहेश्वर जंगम संस्था पुणे यांचे खूप आभारी आहे हे सोनेरी ग निबंधाच्या निमित्ताने क्षण पुन्हा डोळ्यांसमोरून गेले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती