सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे मिशन बारामती ,अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांना भोर वेल्हा मुळशीची जबाबदारी

डिजिटल पुणे    19-04-2024 14:19:25

पुणे : राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघापैकी बारामतीची लढत ही अतिशय अटीतटीची दोन्ही बाजूने करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत असल्याने महायुतीसह महाविकास आघाडीने देखील प्रचाराला चांगलीच धार लावली आहे. अशातच आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपापल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली असून बैठकांचा सपाटा लावला आहे.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर बारामतीची लढत आता प्रतिष्ठेची झालीय.  त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू केलीय.पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढवत असलेल्या सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार स्वत : जातीने प्रचाराच्या कामाला लागले आहेत. मतदारसंघातील विविध भागांमध्ये सभा, मेळावे, कोपरसभा, मतदारांसोबतच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. यातच आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मिशन बारामती सोपवलं आहे. याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहारातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे मिशन बारामती सोपवली आहे.

 याचाच भाग म्हणून अजित पवार गटाकडून पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांना भोर वेल्हा मुळशीची जबाबदारी देण्यात आलीय. गेल्या महिन्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर वेल्हा मुळशी भागातील नागरिकांचा मेळावा घोटावडे फाटा येथे झाला. या मेळाव्याला माजी नगरसेवक मयुर कलाटे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवडचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, बारामती मतदारसंघ पिंपरी चिंचवड शहाराच्या हद्दीपर्यंत असून मुळशी-भोर वेल्ह्यात पिंपरी शहरातील अनेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे नात्यागोत्यांचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरविण्यासाठी गावकी-भावकीच्या मतांची बेरीज करण्यासाठी अजित पवारांनी बारामती मतदारसंघातील भोर वेल्हा मुळशी तालुक्यांची जबाबदारी आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती