सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?

पुजा    19-04-2024 16:45:16

पुणेः  पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार यांच्याकडे ८ कोटी १६ लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता आहे. त्यांच्यावर एकूण ७१ लाख १५ हजार ४३५ रुपयांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार झालेल्या धंगेकरांच्या संपत्तीत आमदार झाल्यावर वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. 

धंगेकर हे आठवी उत्तीर्ण आहेत. धंगेकर यांच्याकडे रोख ७६ हजार ४०० रुपये, तर पत्नीकडे ६२ हजार १०० रुपये आहेत. धंगेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शेती, सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम व्यवसाय आहे. धंगेकर यांची जंगम मालमत्ता २३ लाख २६ हजार ८३ रुपये, तर पत्नीकडे ७२ लाख ३८ हजार ४४३ रुपयांची मालमत्ता आहे. 

धंगेकर यांची स्वसंपादित आणि वारसाप्राप्त स्थावर मालमत्ता ४ कोटी ५९ लाख ६३ हजार ९५८ आहे, तर पत्नीकडे २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. धंगेकर यांची दौंड तालुक्यात पिंपळगाव आणि हवेली तालुक्यात नांदोशी येथे शेती असून, कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. धंगेकर यांच्यावर आठ प्रलंबित खटले आहेत जे शिवाजीनगर, समर्थ पोलिस स्टेशन, बंडगार्डन पोलिस स्टेशन. विश्रामबाग चतुश्रृंगी पोलिस स्टेशन आणि निगडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. 

दरम्यान, एका वर्षात मालमत्तेत २३ लाखांनी घट झाली असे म्हटले जाते. गेल्या वर्षी कसबा पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात धंगेकर यांनी स्वतःची जंगम मालमत्ता ४७ लाख ६ हजार १२८ दाखविली होती. आता लोकसभेसाठी २३ लाख २६ हजार ८३ रुपये दाखविली आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेत एका वर्षात २३ लाखांनी घट झाली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती