सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

पुजा    19-04-2024 18:10:43

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी सहपत्नीक डॉ. सविता शिवाजी काळगे यांच्यासह लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली व उमेदवारी अर्ज प्रारंभक पूजन केले. आज लातूर लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला , यावेळी सहकारमहर्षी तथा माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख , खासदार तथा माजी मंत्री आदरणीय चंद्रकांत हंडोरे , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हासदादा पवार, काँग्रेसचे नेते, माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख ,  धीरज भैया देशमुख, माजी आमदार विनायकराव पाटील ,  अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या समवेत उपस्थित होते. 

ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचविण्यासाठी सुरू असलेला लढा आहे. जनतेला महागाई, बेरोजगारी यातून मुक्त करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आहे. या लढाईला, या संघर्षाला आपण सर्वजण भक्कम पाठिंबा द्याल. आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना बहुमताने निवडून आणाल, असा आम्हाला विश्वास आहे. अशी प्रतिक्रया देखील माध्यमांसमोर अनेक नेत्यांनी वक्त केले. 

आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकसेवेसाठी आशीर्वाद प्राप्त व्हावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. इंडिया आघाडीचे मित्रपक्ष ही या कामाला लागले आहेत. सर्वांनी डॉ. काळगे यांच्या पाठीशी उभे राहावे. डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली आहे, त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे, डॉ. काळगे यांचे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ब्रीदवाक्य आहे, त्यांना आम्ही महाविकास आघाडीचे उद्याचे नेते म्हणून पाहतो  असे ते म्हणाले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती