सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पावसातही प्रचार दौरा सुरू ; पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित

डिजिटल पुणे    25-04-2024 15:09:47

बारामती : राज्यात अवकाळी पावसाचे संकट ओढावले असून अनेक ठिकाणी दुपारच्या कडाक्याच्या उन्हानंतर संध्याकाळी पाऊस होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. यामध्ये पावसाने काही वेळा अडथळा येत असल्याचे दिसून येते. मात्र तरी देखील काल  बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पावसातही आपला प्रचार दौरा सुरू ठेवल्याचे पाहायला मिळाला. विशेष म्हणजे याप्रसंगी मोठ्या संख्येने लिंगाळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बारामतीची लोकसभा निवडणूक ही पवार विरूद्ध पवार अशी असल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सुनेत्रा पवार स्वतः रात्रंदिवस प्रचारात व्यस्थ असल्याचे चित्र आहे. काल तर लिंगाळी गावात रिमाजीम पावसात तिन्ही सांजेला त्यांची प्रचार यात्रा सुरू होती. पाऊस असून देखील या ठिकाणी वाद्यांच्या गजरात सजवलेल्या बैलगाडीतून त्यांना मिरवणुकीने सभेच्या ठिकाणी नेण्यात आले.

यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी हातवळन येथे जाऊन लोकनेते स्व. नानासाहेब फडके यांच्या पहिल्या स्मृतिदिन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी त्या म्हणाल्या, आदरणीय स्व. नानासाहेबभाऊंनी समाजकारण, राजकारण करताना विशेषतः सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांनी आयुष्यभर समाजाचा विचार केला. समाजासाठी चंदणाप्रमाने झिजले. त्या कार्याचा सुगंध आजही दरवळत आहे.

मलठण येथे ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी  महायुतीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. महायुतीच्याच माध्यमातून विकासकामे होत आहेत आणि यापुढेही होणार आहेत. त्यामुळे महायुतीलाच कोणत्याही परिस्थितीत मताधिक्य मिळणार आहे, अशी ग्वाही यावेळी ग्रामस्थांनी दिली.

यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेशआप्पा थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, उत्तम आटोळे महायुतीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी स्वागत केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती