सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

'कणखर भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा' ; अजित पवारांनीं घेतलेल्या 'त्या' निर्णयानंतर पत्नीचे आवाहन

पुजा    25-04-2024 16:32:23

पुणे : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दौंड तालुक्याचा दौरा केला. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यांनी दौंड तालुक्यात संयुक्त दौरा केला. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख नेते एकवटल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यातील खडकी येथून पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. एका शेतकऱ्याची बायको आहे. सतत शेतकरी कुटुंबात वावरल्याने मला शेतकऱ्यांच्या विविध अडचणी माहित आहे. संसदेत गेल्यानंतर मी नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईल, असा विश्वास त्यांनी वक्त केला. त्यासोबतच सक्षम भारतासाठी विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचविला आहे. म्हणूनच आपण सर्वांनी कणखर भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आव्हान सुनेत्रा पवार यांनी केले. 

यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ही निवडणूक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची नसून देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातात द्यायचा यासाठी ही निवडणूक आहे. ही कुटुंबातील आणि नात्यातील निवडणूक आहे, असा संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र ही निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील आहे. सक्षम भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ही सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

 या दौऱ्यादरम्यान महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड, बारामती, इंदापूर, दौंड या ठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. अशी देखील माहिती मिळत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती