सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

साऊथ इंडस्ट्रीचे अभिनेते डॅनियल बालाजी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पुजा    30-03-2024 17:13:37

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तमिळ सिनेमाचे नावाजलेले अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झालं आहे. हृदविकाराच्या झटक्याने डॅनियल यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ४८व्या वर्षी डॅनियल बालाजी यांनी अखेरचा श्वास घेतला. डॅनियल बालाजीच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्याला २९ मार्च रोजी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. पण सर्व प्रयत्न करण्यात आले पण डॅनियलचं निधन झालं. शुक्रवार २९ मार्च रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॅनियल बालाजीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डॅनियल बालाजीच्या पार्थिवावर २९ मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दाक्षिणात्य सिनेसृष्टीतूनही डॅनियलच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

डॅनियल बालाजीच्या निधनानं तमिळ सिनेइंडस्ट्रीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी डॅनियल बालाजीच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. तर डॅनियलच्या कुटुंबावर तसंच मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना केल्या आहेत. डॅनियल बालाजी यांनी आपल्या करिअरची सुरुवात कमल हसन यांच्या  मरुधनायगम या चित्रपटातून केली होती, जो कधीच प्रदर्शित झाला नव्हता. यानंतर ते टेलिव्हिजनकडे वळले. 'चिट्ठी' या मालिकेमुळे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. डॅनियल बालाजी यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

डॅनियल बालाजी यांनी तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. वेट्टैयाडु विलैयाड, पोलाधवन आणि Vada Chennai यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांनी कमल हासन, थलापति विजय आणि सूर्या अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती