सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

सिनेविश्वातून खुशखबर : येतोय दुनियादारी २ ; अभिनेत्री सई ताम्हणकरकडून घोषणा

पुजा    11-04-2024 15:24:57

पुणे : खऱ्या अर्थाने, अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्यासाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सई कधी मराठी चित्रपटामुळे तर कधी बॉलिवूड चित्रपटांमुळे ती चर्चेत राहिली आहे. नुकतेच या अभिनेत्रीने  मॅशेबल इंडियाच्या द बॉम्बे जर्नी या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने एक मोठा खुलासा केला. या शो मध्ये तिने दुनियादारी या चित्रपटाबद्दल मोठी घोषणा केली. 

शोचा होस्ट सिद्धार्थने तुम्ही सगळ्यांनी दुनियादारी सिनेमाच्या कास्टच्या रियुनियनचा विचार केला आहे का? असा प्रश्न विचारला त्यावेळी तिने सिनेमाच्या सिक्वेलवर काम करत असल्याची गोष्ट रिव्हील केली. ती म्हणाली,"खरंतर आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी ही गोष्ट आधी कोणत्याही मुलाखतीमध्ये रिव्हील केली नाहीये. मी पहिल्यांदा या शोमध्ये बोलतेय. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. ती खरंच खूप चांगली स्क्रिप्ट आहे. अजून आम्ही याविषयी घोषणा केली नाहीये आणि मला आशा आहे कि आम्ही हा सिनेमा बनवू. आता आम्ही फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर काम करतोय. " 

सईच्या या खुलास्याने दुनियादारीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांचा आनंद व्यक्त केला. या सिनेमात कोणते कलाकार असणार? सिनेमाचं कथानक काय असेल? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. दुनियादारी या सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव दुनियादारीच्या सिक्वेलची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

दरम्यान, दुनियादारी हा मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात जास्त गाजलेल्या सिनेमांपैकी एक. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, जितेंद्र जोशी, यांच्या मुख्य भूमिका असलेला या सिनेमाने एक माहोल काही काळ मराठी सिनेविश्वात तयार केला. कॉलेज लाईफ, कट्ट्यावरची धमाल, मैत्री या सगळ्यांवर भाष्य करणारा सिनेमा आजही अनेकजण आवर्जून पाहतात. या सिनेमातील गाणीही आजही तितकीच मराठी प्रेक्षकांची लाडकी आहेत. 

सई नेहमी वेगवेगळ्या वेब सिरीज आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते असते. सईच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल सांगायचे झाले तर  अग्नी ही तिची आगामी वेबसिरीज असून यातून ती एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यासोबतच ती अभिनेता जितेंद्र जोशीसोबत आणखी एका वेबसिरीजमध्ये काम करतेय. त्यासोबत तिच्या पर्सन लाईफ सांगायचं झाले तर गेल्या वर्षी सईने नवं घर खरेदी केलं, या वर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तिने थेट नवी कोरी अलिशान कारच खरेदी केली. नवी कोरी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती